गेल्या २४ तासांतील सलग तीन भुकंपांनी तुर्की, सिरीया हादरला आहे. यामुळे जगासमोरही मोठे संकट उभे ठाकले आहे. हा भाग चार प्लेट्सवर असल्याने तिथे नेहमी छोटे छोटे भूकंप येत असतात. परंतू, आज पहाटे आलेला हा भीषण भूकंप तीन दिवसांपूर्वीच सांगण्यात आला होता. याकडे दुर्लक्ष केले गेला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एका डच शास्त्रज्ञाने ३ फेब्रुवारीलाच या भागात मोठा भूकंप येणार असल्याचे ट्विट केले होते. महत्वाचे म्हणजे भूकंपाचा केंद्रबिंदू, रिश्टर स्केल तीव्रता आदी त्याने अचूक सांगितले होते. फक्त त्याने वेळ सांगितली नव्हती. आज किंवा भविष्यात कधीही असे तो म्हणाला होता. एवढी अचूक भविष्यवाणी गांभिर्याने घेतली असती तर आज तुर्की, सिरीयातील हजारो मृत्यू वाचविता आले असते.
सीरियाच्या सीमेपासून सुमारे 90 किलोमीटर (60 मैल) अंतरावर गाझिआनटेप शहराच्या उत्तरेला भूकंपाचे केंद्र होते. डिसेंबर 2022 मध्ये देखील एका भूकंप तज्ञाने भूकंपाचा अंदाज वर्तवला होता. आणखी एक डच संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनीही तीन दिवसांपूर्वी भूकंपाची सूचना दिली होती.
हूगरबीट्स हे नेदरलँड्समधील सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (SSGS) संस्थेसाठी काम करतात. "लवकर किंवा नंतर या प्रदेशात (दक्षिण-मध्य तुर्की, जॉर्डन, सीरिया, लेबनॉन) ~M 7.5 भूकंप होईल." असे त्यांनी मॅप देऊन सावध केले होते. मी आधी सांगितल्याप्रमाणे, या प्रदेशात 115 आणि 526 प्रमाणेच लवकरच किंवा नंतर असे घडेल, असे म्हटले होते. तेथील भूगर्भात ४, ५ फेब्रुवारीला मोठ्या हालचाली होण्याचे संकेत मिळाले होते, असे हूगरबीट्स यांनी म्हटले.