शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

भारताच्या शस्त्र साठ्याचा शोध घेतंय ISI, अफगाणी सैनिक आणि अधिकारी रडावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 3:48 PM

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाती सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

काबुल: 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबाननं देशात कब्जा केला. तालिबानच्या येण्यानं आता जगाची चिंता वाढली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाच्या सूत्रांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि तालिबान अफगाणिस्तानला मिळणाऱ्या भारतातील शस्त्रास्त्र आणि इतर हत्यारांच्या पुरवठा साखळीचा तपास करत आहे.

अधिकारी आयएसआयच्या रडारवरसीएनएन-न्यूज 18 शी केलेल्या विशेष संभाषणात नाव न छापण्याच्या अटीवर, उच्च अधिकाऱ्यानं सांगितलं की, सर्व एनडीएस अधिकारी, अफगाण सैनिक आयएसआय आणि तालिबानच्या रडारवर आहेत. आयएसआय फक्त भारत किंवा इंडियन मिलिटरी अकादमीवर नाही, तर आयएमएमध्ये प्रशिक्षित अधिकाऱ्यांवरही लक्ष ठेवून आहे. काही अधिकारी आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहितीही अधिकाऱ्यानं दिली. तसेच, आयएसआयवर दहशतवादी संघटनांना निधी पुरवण्याचा, पाकिस्तानात दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि प्रशिक्षण देण्याचा आरोप लावला आहे.

तालिबानच्या भीतीनं सैनिकांचं पलायन15 ऑगस्ट रोजी तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा केला. त्यानंतर रस्त्यावर अनेक ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले होते. तसेच, तालिबानी सैनिकांकडून राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाच्या (एनडीएस) सदस्यांचा शोध घेतला जातोय. याशिवाय, अमेरिकेला मदत करणाऱ्या अफगाणी सैनिकांचाही तालिबानकडून शोध सुरू आहे. ISI आणि तालिबानच्या भीतीनं अनेक अफगाण सैनिक मिल्ट्री वाहनं आणि पिकअप ट्रकमधून इराणकडे जात आहेत. अफगाणिस्तानच्या एका माजी अधिकाऱ्याच्या मते, तालिबाननं अमेरिकेला मदत करणाऱ्यांची हिट लिस्ट तयार केली आहे. तसेच, अमेरिकेला मदत करणारे पुढे आले नाही, तर त्यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी तालिबानकडून देण्यात येतीय. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानISIआयएसआय