शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

पाकमध्ये पुन्हा तालिबानी थैमान

By admin | Published: January 21, 2016 4:10 AM

पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वॉ प्रांतात चारसद्दा येथील प्रसिद्ध बादशहा खान विद्यापीठावर तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात विद्यार्थी व शिक्षकांसह किमान २५ जण ठार तर ५० जण जखमी झाले.

पेशावर : वायव्य पाकिस्तानातील अशांत खैबर पख्तुनख्वॉ प्रांतात चारसद्दा येथील प्रसिद्ध बादशहा खान विद्यापीठावर तालिबानी अतिरेक्यांनी बुधवारी सकाळी केलेल्या अमानुष हल्ल्यात विद्यार्थी व शिक्षकांसह किमान २५ जण ठार तर ५० जण जखमी झाले. सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्यसेनानी खान अब्दुल गफ्फार खान यांचे नाव धारण करणाऱ्या या विद्यापीठात त्यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त कवितांवर परिसंवाद सुरू असताना तालिबानींनी हा राक्षसी रक्तपात केला. लष्कराने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत चारही हल्लेखोरांचा खात्मा करेपर्यंत त्यांनी वर्गखोल्या आणि वसतिगृहात शिरून केलेल्या बेछूट गोळीबाराने अंगाचा थरकाप उडविणारे रक्ताचे पाट वाहिले होते.हे विद्यापीठ पेशावरपासून ५० किमी अंतरावर आहे. आजच्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने दोन वर्षांपूर्वी १६ डिसेंबर रोजी पेशावरमध्ये लष्करातर्फे चालविल्या जाणाऱ्या विद्यालयात असाच राक्षसी हल्ला करून १२६ निरागस विद्यार्थ्यांचे बळी घेतले होते. त्या हल्ल्याबद्दल अलीकडेच तालिबानच्या चार अतिरेक्यांना फासावर लटकविण्यात आले होते. त्याचा सूड घेण्यासाठी हल्ला केल्याचा दावा तालिबानने केला व हे हल्ले यापुढेही सुरूच राहतील, असा इशाराही दिला.हल्ला होताच पेशावरहून मोठी लष्करी कुमक विद्यापीठात दाखल झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. सर्व इस्पितळांमध्ये आणीबाणी जाहीर करून सर्व शाळा-कॉलेजे बंद करण्यात आली. लष्कराच्या कारवाईत चार हल्लेखोर ठार झाल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. त्याआधी विद्यापीठाच्या आतून गोळीबार करणारे दोन दहशतवादी लष्कराने ठार मारले. हल्ला झाला त्या वेळी विद्यापीठात तीन हजार विद्यार्थी व चर्चासत्राला ६०० पाहुणे उपस्थित होते, असे कुलगुरू डॉ. फजल रहीम यांनी सांगितले. पाकचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन व पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या निर्धारापासून सरकार अशा हल्ल्यांमुळे हटणार नाही, असे शरीफ म्हणाले. या अतिरेकी हल्ल्यानंतर विद्यापीठातील कर्मचारी आणि विद्यार्थी भेदरलेले असताना अशाही परिस्थितीत तेथील रसायनशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक सय्यद हामिद (३४) यांनी अतिरेक्यांशी दोन हात केले. मात्र, विद्यार्थ्यांना वाचविताना अतिरेक्यांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या नागरिकांनी सोशल मीडियावर प्रोफेसर सय्यद हामिद यांचा शहीद म्हणून उल्लेख करत दु:ख व्यक्त केले.> मोदींकडून निषेधपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करून मृतांच्या नातेवाइकांप्रति संवेदना व्यक्त केली. ‘पाकिस्तानच्या बाचा खान विद्यापीठावरील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. मृतांच्या नातेवाइकांप्रति संवेदना, जखमींसाठी प्रार्थना करतो,’ असे टिष्ट्वट मोदींनी केले. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही या हल्ल्याचा निषेध केला.> काश्मिरात दहशतवादी ठारश्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी ठार झाला. त्यानंतर सुरक्षा दलाने जमावाला पांगविण्यास केलेल्या गोळीबारात एक तरुण मृत्युमुखी पडला.