Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून पळ काढलेले राष्ट्रपती अशरफ घनी (Ashraf Ghani), उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (Amrullah Saleh) आणि अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब (Hamdullah Mohib) यांना माफ केल्याचं तालिबान्यांनी जाहीर केलं आहे. तसंच या तिघांनीही अफगाणिस्तानमध्ये परतावं असं आवाहनही तालिबानकडून करण्यात आलं आहे.
१६८ जणांना घेऊन भारतीय हवाई दलाचं विमान भारतात दाखल, आणखी एक विमान ८७ भारतीयांना घेऊन रवाना
१५ ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देशातून पळ काढला होता. ते सध्या आपल्या कुटुंबीयांसह यूएईमध्ये आश्रयाला आहेत. त्यांच्यासोबत हमदुल्लाह मोहिब देखील आहेत. तर अमरुल्लाह सालेह यांनी तालिबान्यांशी दोन हात केले असून ते अफगाणिस्तानमध्येच असल्याचं सांगितलं जात आहे. अशरफ घनींच्या अनुपस्थितीत कायदेशीरपद्धतीनं आपणच आता काळजीवाहू राष्ट्रपती असल्याचं सालेह यांनी याआधी घोषीत केलं आहे. दरम्यान, तालिबानी नेता खलील उर रहमान हक्कानी यानं पाकिस्तानातील जिओ न्यूजला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तालिबानचं अशरफ घनी, अमरुल्लाह सालेह आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिम यांच्याशी कोणतंही वैर राहिलेलं नाही. तालिबाननं या तिघांनाही माफी दिलेली आहे. या तिघांसोबतचं वैर हे फक्त धार्मिक आधारावर होतं. पण आता त्यांना आम्ही माफ केलं आहे. त्यांनी देशात परत यावं, असं आवाहन तालिबाननं केलं आहे.
अफगाणिस्तानवर नवं संकट! खतरनाक IS कडून काबुल विमानतळावर हल्ल्याची शक्यता, अमेरिकेनं दिला इशारा
अफगाणिस्तान सोडून जाणाऱ्या अफगाणी नागरिकांनाही तालिबान्यांनी देश सोडून न जाण्याचं आवाहन केलं आहे. तालिबानकडून बदला घेतला जाईल असा अपप्रचार शत्रुंकडून केला जात आहे. पण तसं अजिबात नाहीय. ताजिक, बलोच, हजारा आणि पश्तून हे सर्व आमचे बंधू आहेत. सर्व अफगाणी नागरिक आमचे नागरिक आहेत. त्यामुळे देशात परतू शकतात. आमचं वैर हे फक्त राजकीय यंत्रणा बदलण्यापुरतं मर्यादित होतं. यंत्रणा आता बदलली आहे आणि वैर संपलेलं आहे. अमेरिकेविरोधात आम्ही यासाठीच शस्त्र उचलले होते कारण त्यांनी आमच्या मातृभूमीवर हल्ला केला होता, असं तालिबानी प्रवक्ता खलील हक्कानीनं म्हटलं आहे.