शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

Taliban : हक्कानी नेटवर्कच्या कमांडरची हत्या, तालिबान-पाकिस्तानला मोठा धक्का, पुन्हा संघर्ष सुरू होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 10:23 AM

Taliban : काबूल ताब्यात घेतल्यानंतर हमदुल्ला मुखलिस हा राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या कार्यालयात प्रवेश करणारा पहिला होता. हमदुल्ला मुखलिस याचे घनी यांच्या खुर्चीवर बसलेले फोटो व्हायरल झाले होते.

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबनी सत्ता आल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कला सर्वात मोठा झटका बसला आहे. तालिबान सरकारमध्ये गृहमंत्री बनलेल्या हक्कानी नेटवर्कचे प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी यांचा मुख्य लष्करी रणनीतीकार हमदुल्ला मुखलिस आणि काबूलचा कमांडर हमदुल्ला मुखलिस हा एका भीषण आत्मघातकी हल्ल्यात ठार झाला आहे. काबूल ताब्यात घेतल्यानंतर हमदुल्ला मुखलिस हा राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या कार्यालयात प्रवेश करणारा पहिला होता. हमदुल्ला मुखलिस याचे घनी यांच्या खुर्चीवर बसलेले फोटो व्हायरल झाले होते. 

काबूलमध्ये मंगळवारी झालेल्या दोन भीषण बॉम्बस्फोट आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हमदुल्ला मुखलिस हा तालिबानच्या विशेष दल बद्री ब्रिगेडचा कमांडरही होता. या ब्रिगेडला काबूलमधील सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. तालिबान कमांडरच्या मृत्यूने हक्कानी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी हमदुल्ला पाकटिका आणि खोश्त प्रांतात तालिबानचा शॅडो गव्हर्नर होता.

'तालिबानी नेतृत्व हादरले असावे'आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, मात्र आयएसआयएस (ISIS) संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा आत्मघाती हल्ला केल्याचे म्हटले जात आहे. अफगाणिस्तानचे पत्रकार बिलाल सरवारी यांनी ट्विट केले की, 'आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना आता त्यांचे पहिले सर्वात महत्त्वाचे लक्ष्य साध्य करण्यात यश आले आहे. हमदुल्ला हा तालिबानचा सर्वात करिष्माई नेता होता. यामुळे तालिबानी नेतृत्व हादरले असावे.' याचबरोबर, येत्या काही दिवसांत आणि महिन्यांत घडणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल, असे बिलाल म्हणाले. तसेच, 'ही अफगाणिस्तानातील नव्या व्यवस्थेची सुरुवात आहे का? याचा तालिबानच्या मनोबलावर परिणाम होईल का?  या हल्ल्यामुळे आयएसआयएसचे मनोबल वाढेल आणि तालिबान नेतृत्वावर आणखी हल्ले होतील का?' असे सवाल केले आहेत.

अंदाधुंद गोळीबार काबूलमधील सर्वात मोठ्या लष्करी रुग्णालयात बंदूकधाऱ्यांच्या एका गटाने हल्ला करून अंदाधुंद गोळीबार केला, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, हल्लेखोर नंतर तालिबानी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले. यादरम्यान तालिबानचा टॉप कमांडर मौलवी हमदुल्ला मुखलिसही मारला गेल्याचे सांगण्यात येत आहे. तो तालिबानच्या काबूल मिलिट्री कोरचा प्रमुख होता.

'15 मिनिटांत हल्लेखोरांना मारले'तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, 400 खाटांच्या सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा बॉम्बस्फोट झाला. यानंतर आयएसआयएसच्या बंदुकधारी गटाने हल्ला केला, ज्यातील सर्वजण 15 मिनिटांत मारले गेले. तालिबानच्या स्पेशल फोर्स कमांडो टीमला हेलिकॉप्टरने रुग्णालयाच्या आवारात सोडण्यात आले. यामुळे हल्लेखोरांना रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखले गेले आणि सर्वांना गेटवर गोळ्या घालून ठार करण्यात आले, असेही जबिहुल्ला  मुजाहिद यांनी सांगितले. 'आयएसआयएस'वर हल्ल्याचा संशयआतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, या हल्ल्यामागे आयएसआयएस संघटनेचा हात असल्याचे म्हटले जात आहे. या दहशतवादी संघटनेने गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये अनेक हल्ले केले आहेत. यातील सर्वात भीषण हल्ला दोन शिया मशिदींवर झाला होता. अफगाणिस्तानातील तालिबानच्या नियंत्रणासाठी आयएसआयएस हा सर्वात मोठा धोका म्हणून समोर आला आहे.

तालिबानचा टॉप कमांडरहमदुल्ला मुखलिस हा तालिबानचा टॉप कमांडर होता. हमदुल्ला मुखलिस याने तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमधील समन्वयासाठीही काम केले. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी हक्कानी नेटवर्कचा नंबर दोन असलेल्या अनस हक्कानीवर सोपवण्यात आली. नंतर राजधानीच्या सुरक्षेची जबाबदारी हमदुल्ला मुखलिस याच्याकडे सोपवण्यात आली होती.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तान