काबुल - अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबानने सक्रीय होतं, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. रविवारी अफगाणिस्तानात मोठ्या घडामोडी घडल्या. तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रवेश करुन राष्ट्रपती भवन आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह अनेक मोठे नेते देश सोडून गेले आहेत. त्यामुळे, अनेक नागरिकही विमानतळावर गर्दी करत आहेत. येथील काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
अफगाणिस्तानातील हजारो सामान्य नागरिकही काबूल सोडून इतर देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे. तर, विमानतळावर मुंबईतील लोकल रेल्वे पकडण्यासाठी होत असलेल्या गर्दीचे रुपडे दिसत आहे.