नवी दिल्ली: अकाली दल आणि तालिबानच्या प्रवक्त्यांनी बुधवारी रात्री उशिरा काबुल गुरुद्वाराच्या प्रमुखांनी जारी केलेलं एक व्हिडिओ निवेदन शेअर केलं. या व्हिडिओ स्टेटमेंटनुसार, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या शीख आणि हिंदूंना तालिबानकडून त्यांच्या सुरक्षिततेचे आश्वासन देण्यात आले आहे. हा व्हिडिओ अल जझीराच्या बातमीतील भाग असल्याचं दिसत आहे. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीच्या राजकीय कार्यालयाचे प्रवक्ते एम नईम यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे.
'याद राखा पंतप्रधान कोण आहेत...' तालिबानचं कौतुक करणाऱ्यांना भाजपा नेत्याचा इशारा
अकाली दलाच्या दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितले की, ते काबुल गुरुद्वाराच्या सतत संपर्कात आहेत आणि तालिबान नेत्यांनी "हिंदू आणि शीखांना भेटून त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे." या 76 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये काही तालिबानी सदस्य गुरुद्वारामध्ये प्रवेश करताना आणि आतमध्ये आश्रय घेत असलेल्या शीखांशी संवाद साधताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये गुरुद्वारा समितीच्या अध्यक्षांचे पश्तो भाषेतील निवेदन देखील आहे.
गृहकर्जावर पीएनबीची जबरदस्त ऑफर, प्रोसेसिंग फीस आणि डॉक्यूमेंटेशन चार्जपासून 'स्वातंत्र्य'
डॉ. एम नईमनेही हाच व्हिडिओ शेअर करत अरबी भाषेत ट्विट केले आहे. त्या ट्विटचे भाषांतर असे की, 'काबूलमधील शीख आणि भारतीयांच्या मंदिरांचे प्रमुख सुरक्षित असल्याचे सांगत आहोत. त्यांनी भीती किंवा चिंता वाटून घेऊन नये. पूर्वी लोक घाबरले होते आणि काळजीत होते. पण आता, त्यांच्या आयुष्याबद्दल आणि पैशाबाबत कोणतीही अडचण नाही.'