वॉशिंग्टन: अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर तालिबाननं अफगाणिस्तावर कब्जा मिळवला. 15 ऑगस्ट रोजी तालिबाननंअफगाणिस्तानची राजधानी काबुलवर कब्जा मिळवल्यानंतर देशात तालिबानी सरकार आल्याचं निश्चित झालं. पण तुम्हाला जर कळलं की, ही सर्व घटना आधीपासूनच ठरलेली होती, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना?
अमेरिकेतील पत्रकार फ्रेडरिक मॅकार्थी फोर्सिथ यांनी 8 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमधील सद्य परिस्थितीची भबिष्यवाणी केली होती. 2013 मध्ये त्यांच्या 'द किल लिस्ट' या पुस्तकाच्या एका अध्यायात त्यांनी एक दिवस अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघार घेईल आणि तालिबानचं राज्य पुन्हा येईल, असं म्हटलं आहे. त्याचबरोबर फोर्सिथनं पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंधांचाही उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे.
तालिबानला होता विश्वास की...पुस्तकाच्या 9 व्या अध्यायात असं सांगण्यात आलंय की, तालिबाननं वीस वर्षांपूर्वी सत्ता गमावल्यानंतरही त्यांचे पाकिस्तानच्या आयएसआयशी असलेले जुने संबंध संपले नव्हते. शेवटी ISI नं तालिबानला पाठबळ दिलं आणि तेव्हापासून ते अफगाणिस्तानवर लक्ष ठेवून होते. त्यांना विश्वास होता की, एक दिवस अमेरिका अफगाणिस्तान निघून जाईल आणि पुन्हा अफगाणिस्तावर तालिबानची सत्ता येईल.
पाकिस्तानात उदयास आला तालिबानदरम्यन, ही कादंबरी काल्पनिक घटनांवर आधारित असली तरी, अफगाणिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या तालिबानच्या संकटाबाबत आणि भारताबरोबर पाकिस्तानच्या संबंधांबाबत यात लिहून ठेवण्यात आलंय. पाकिस्तानला भारत आणि अफगाणिस्तानसारखे दोन शत्रू दोन सीमेवर नको आहेत. एक शत्रू पुरेसा असेल आणि तो भारत असेल, असे त्यात म्हटले आहे. तसेच, सोव्हिएत युनियन अफगाणिस्तानात परतल्यानंतर 1990 च्या दशकात तालिबान (पश्तून भाषेतील विद्यार्थी) उत्तर पाकिस्तानात उदयास येऊ लागले, अशी माहितीही त्यात देण्यात आली आहे.