काबूल : तालिबानने अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील कुंदूझवरील पकड घट्ट केली आहे, तर दुसरीकडे कुंदूझ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अफगाण फौजांच्या मदतीला नाटोचे एक पथक धावून आले आहे. अफगाणी फौजांनी तालिबानच्या कब्जातून कुंदूझ परत घेण्यासाठी मोहीम सुरू करूनही तालिबानने बाला हिसार किल्ला कब्जात घेतला. अफगाण सुरक्षा दलाने कुंदूझ शहरातील किती भाग पुन्हा परत घेतला, हे स्पष्ट झाले नाही.कुंदूझवरील कब्जा म्हणजे तालिबानांसाठी २००१ नंतरचे मोठे यश मानले जाते. तालिबानने बाला हिसार किल्ल्यात शेकडो अफगाणी सुरक्षा सैनिकांना कोंडून ठेवले असून त्यांचे भवितव्य अद्याप स्पष्ट झाले नाही. मंगळवारी तालिबानांनी विमानतळही कब्जात घेण्याचा प्रयत्न केला; परंतु अमेरिकेच्या हवाई हल्ल्यामुळे त्यांना आगेकूच करता आली नाही. कुंदूझ शहर आणि आसपासच्या भागात मंगळवारी रात्रभर चकमकी झडत होत्या. कुंदूझ हे अफगाणिस्तानमधील मोठे शहर आहे. (वृत्तसंस्था)
तालिबानची पकड कुंदूझवर घट्ट
By admin | Published: October 01, 2015 12:10 AM