अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सरकार स्थापनेची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी मुल्ला मुहम्मद हसन अखुंदला अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष घोषित केले आहे. तर मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हक्कानीला गृहमंत्री. यावर कडी म्हणून की काय शिक्षणमंत्र्याने मुळ उद्देशालाच सुरुंग लावण्याचे काम केले आहे. (No PHD, Masters degree needed in Afghanistan: Taliban Education minister)
अफगाणिस्तानाच्या नव्या तालिबानी सरकारने आपल्या नीती घोषित करण्यास सुरुवात केली आहे. तालिबानच्या नवीन शिक्षण मंत्र्यांनी अकलेचे तारे तोडत आजच्या काळात पीएचडी किंवा अन्य कोणतीही मास्टर डिग्री काही कामाची नाही, असे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.
शिक्षण मंत्री शेख मौलवी नूरल्लाह मुनीर यांच्यानुसार, आज देशात मुल्ला आणि तालिबानचे सरकार आहे. आमच्यापैकी कोणाकडेही कसलीही डिग्री नाहीय, तरी आम्ही महान आहोत. यामुळे आजच्या काळात कोणत्याही प्रकारच्या पीएचडी किंवा मास्टर डिग्रीची आवश्यकता नाही.
तालिबानने सत्तेत येताच अनेक बदल करण्यास सुरुवात केली आहे. मुला मुलींच्या वर्गात मध्ये पडदा लावणे, पुरुष शिक्षकांनी न शिकविणे आदी अटी घालण्यात आल्या आहेत. तालिबानने देशाच्या लोकांना आश्वासन दिले आहे की, इस्लामिक आणि शरिया कायद्यानुसार शिक्षण क्षेत्राचा विकास केला जाईल. अद्ययावत शिक्षणासाठीदेखील प्रयत्न केले जातील. देशातील हुशार विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारी भीती मनात बाळग नये असे सांगितले आहे.
असं असेल तालिबानी मंत्रिमंडळअब्दुल गनी बरादर उपपंतप्रधान असतील. खैरउल्लाह खैरख्वा हे माहिती प्रसारण मंत्री असतील. अब्दुल हकीम याच्याकडे कायदे मंत्रालय असेल. शेर अब्बास स्टानिकजई परराष्ट्र राज्य मंत्री असतील. तर जबिउल्लाह मुजाहिदला माहिती प्रसारण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. तालिबान सरकारमध्ये त्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे जे २० वर्षापासून अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तानविरोधात मोर्चा उघडला होता. गैर तालिबानींना अफगाणिस्तानच्या नव्या सरकारमध्ये सामावून घ्या अशी मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. परंतु ती मागणी पूर्ण झाली नाही.