शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये मोदींच्या पराभवाची चर्चा

By admin | Published: November 08, 2015 6:57 PM

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाल्याने देशभरात चर्चा रंगली असतानाच पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांमध्येही बिहार निवडणूक सुपरहिट ठरली आहे.

ऑनलाइन लोकमत

कराची, दि. ८ - बिहार विधानसभा निवडणुकीत  भाजपाचा दारुण पराभव झाल्याने देशभरात चर्चा रंगली असतानाच पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांमध्येही बिहार निवडणूक सुपरहिट ठरली आहे. पाकिस्तानमधील सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये बिहार निवडणुकीत मोदींचा पराभव झाल्याच्या बातमीला अग्रस्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात 'मोदींचा पराभव' असाच उल्लेख करण्यात आला आहे.

बिहार निवडणुकीत चुकून भाजपाचा पराभव झाल्यास पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील असे वादग्रस्त विधान अमित शहा यांनी केले होते. यानंतर बिहारमधील निवडणुकीत प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये पाकिस्तानचाही समावेश होता. याची दखल पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनीही घेतली होती. रविवारी मतमोजणीत बिहारमधील जनतेने जदयूप्रणित महाआघाडीला भरभरुन मतं दिली व भाजपाचा जोरदार दणका दिला. भाजपाच्या पराभवाला पाकिस्तानमधील डॉन, जिओ टीव्ही, दुनिया टीव्ही, ट्रिब्यून अशा विविध प्रसारमाध्यमांनी बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्यात मोदींचा पराभव झाल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बिहारमध्ये पहिल्यांदाच हिंदूत्ववादी मोदींचा पराभव झाला असा उल्लेख सर्वच वृत्तपत्रांमध्ये दिसून येतो.भाजपाला तीस टक्के जागाही मिळवत्या आल्या नाहीत असे वृत्तात म्हटले आहे.