शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

China Tank Video: चीनमध्ये बँकांबाहेर रणगाडे, लाखो लोकांची खाती फ्रिज; अब्जावधी डॉलर गायब झाल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 1:02 PM

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हेनान प्रांतातील आहे. बँकेबाहेर अनेक रणगाडे तैनात केल्याचे दिसत आहेत.

चीनमध्ये मोठे बँकिंग संकट उभे ठाकले आहे. परिस्थिती एवढी चिघळलीय की बँकांबाहेर रणगाडे उभे करावे लागले आहेत. लाखो ग्राहकांची अकाऊंटच फ्रिज करण्यात आली आहेत. ग्राहकांनी त्यांचे पैसे बँकेतून काढू नयेत म्हणून चीन निर्दयी वागू लागला आहे. हजारो लोक रस्त्यावर आंदोलन करत आहेत. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हेनान प्रांतातील आहे. बँकेबाहेर अनेक रणगाडे तैनात केल्याचे दिसत आहेत. लोकांनी बँकेत घुसू नये म्हणून आंदोलन दडपण्यासाठी हे रणगाडे उभे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

एप्रिलमध्ये साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली होती. चिनी बँकांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवर हे होते. हा घोटाळा 40 अब्ज युआन म्हणजेच ६ अब्ज अमेरिकी डॉलर एवढा असल्याचे म्हटले होते. चिनी बँकांमधून एवढी मोठी रक्कम गायब झाल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर चीनमध्ये मोठी खळबळ उडाली होती. हेनान आणि अनहुई प्रांतात बँकांमधील नागरिकांची खाती वापरण्यास मज्जाव करण्यात आला होता. यावेळी सिस्टिम अपग्रेड करण्यात येत आहे, असे कारण दिले जात होते. 

परंतू, जसजसे लोकांना पैसे काढणे कठीण होऊ लागले तसतसे लोकांचा उद्रेक सुरु झाला. त्यात लॉकडाऊन लागल्याने निर्बंध येऊ लागले. या घोटाळ्यात न्यू ओरिएंटल कंट्री बँक ऑफ कॅफेंग, जिचेंग हुआंगहुई कम्युनिटी बँक, शांगकाई हुइमिन काउंटी बँक आणि युजौ शिन मिन शेंग विलेज बँक यांचा समावेश आहे. या बँकांचे ग्राहक गेले तीन महिने पैसे मिळविण्यासाठी बँकांच्या पायऱ्या झिजवत होते. मात्र, आता त्यांचा संयम संपला आणि ते रस्त्यावर उतरले आहेत. 

१९८९ मध्ये असाच नरसंहार...चीन हा कठोर कारवायांच्या देशांमध्ये मोडतो. बँकांबाहेर रणगाडे तैनात केल्याने याची तुलना लोक थियानमन चौकातील घटनेशी करत आहेत. १९८९ लोकांनी सरकारविरोधात या चौकात आंदोलन केले होते. ते चिरडण्यासाठी या लोकांवर चिनी सरकारने रणगाडे चढविले होते. यामध्ये ३००० हून अधिक आंदोलक मारले गेले होते. तर युरोपीय प्रसारमाध्यमांनी या नरसंहाराचा आकडा १० हजार सांगितला होता. 

टॅग्स :chinaचीनbankबँकfraudधोकेबाजी