तेहरानमध्ये हमासचा राजकीय नेता इस्माइल हनियेहच्या हत्येनंतर, इस्रायल आणि इराण यांच्यात थेट लढाई सुरू होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. खरे तर, इस्रायलने या हत्येजी जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, हमास आणि इराणने हनियेहच्या हत्येसाठी इस्रायललाच जबाबदार ठरवले आहे. एढेच नाही तर हनियेहच्या मृत्यूचा बदला घेणे तेहरानचे कर्तव्य असल्याचे इराणचे सर्वेसरावा खामेनेई यांनी म्हटले आहे.
इस्रायलने इराणसह अनेक देशांमध्ये आपल्या सत्रूंच्या हत्या घडवून आणल्याचा आरोप होत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, इस्रायली पत्रकार रोनेन बर्गमॅनने आपल्या 2018 च्या "राइज अँड किल फर्स्ट" या पुस्तकात, विषारी टूथपेस्ट, रिमोट-कंट्रोल बॉम्ब, फुटणारे फोन आदींशी संबंधित 2,700 हून अधिक ऑपरेशन्सची माहिती दिली आहे.
इस्रायलने दीर्घ काळ पॅलेस्टाइनचे नेते राहिलेले यासर अराफात यांना विष दिले होते, असा बर्गमॅन यांचा दावा आहे. मात्र इस्रायल याचे खंडन करतो. याशिवाय, तेहराननेही इस्रायलवर इराणमध्ये अनेकांची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
इराणचे अणुशास्त्रज्ञ -इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमातील एक मुख्य व्यक्ती मानले जाणारे वैज्ञानिक मोहसेन फखरीजादेह यांची नोव्हेंबर 2020 मध्ये हत्या करण्यात आली. यासाठी रिमोट-नियंत्रित मशीन गनचा वापर करण्यात आला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, फखरीजादेह अेक वर्षांपासून इस्रायली गुप्तचर संस्थांच्या टॉप टारगेट्सपैकी एक होते. याशिवाय, 2010 मध्ये तेहरानच्या वेगवेगळ्या भागात अणवस्त्र कार्यक्रमाशी संबंधित दोन जणांना कार बॉम्बने उडवण्यात आले होते. यातील एकाचा मृत्यू झाला तर एक दुसरा गंभीर जखमी झाला होता.
रहस्यमय विष -2022 मध्ये, इराणचे दोन वैज्ञानिक अचानक आजारी पडले आणि कीही दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला. इस्रायलने त्यांना जेवणातून विष दिल्याचे, इराणचे म्हणने होते.