संयुक्त राष्ट्र : अमेरिकेने लावलेल्या करामुळे जागतिक व्यापारात तीन टक्क्यांची घट होण्याची भीती संयुक्त राष्ट्राच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. टॅरिफ करामुळे अमेरिका व चीनसारख्या बाजारांमधील निर्यात भारत, कॅनडा व ब्राझीलसारख्या देशांकडे वळू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टॅरिफमुळे व्यापार पद्धतीत दीर्घ बदल होण्यासोबतच जागतिक व्यापारात ३ टक्क्यांची घट होण्याची भीती आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे कार्यकारी संचालक पामेला कोक-हॅमिल्टन यांनी शुक्रवारी जिनेव्हा येथे व्यक्त केली.
टॅरिफमुळे मेक्सिकोतून होणाऱ्या निर्यातीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. एवढेच नाही तर अमेरिका, चीन, युरोप व दक्षिण अमेरिकन देशांमधील बाजारदेखील दुसरीकडे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे या निर्यातीचा कॅनडा, ब्राझील व भारतालादेखील लाभ होऊ शकतो.
व्हिएतनाममधून अमेरिका, मेक्सिको व चीनमध्ये होणारी निर्यात दुसरीकडे वळत असून ती पश्चिम आशिया व उत्तर आफ्रिकेचा बाजार, युरोपीय संघ, दक्षिण कोरियात होत असल्याचा दावा हॅमिल्टन यांनी केला.
ट्रम्प म्हणतात, मी पूर्णपणे तंदुरुस्त
मी आरोग्याची वार्षिक तपासणी केली असून माझी प्रकृती पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला.
वयाच्या ७८ व्या वर्षी अमेरिकेच्या इतिहासात सर्वांत वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष झालेल्या ट्रम्प यांनी जवळपास पाच तास वाल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरमध्ये आरोग्य तपासणी केली. मी खूप वेळ सेंटरमध्ये होतो.
मला वाटते माझी प्रकृती खूप चांगली आहे, असे ट्रम्प म्हणाले. प्रकृती चांगली असल्याचा दावा ट्रम्प करत असले तरी त्यांचा आरोग्य तपासणी अहवाल लवकरच मिळेल.