शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

'चीनच्या तावडीतून हाँगकाँगला मुक्त करा', निदर्शकांवर अश्रुधूर; १२० जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 2:51 AM

हाँगकाँग : हाँगकाँग पोलिसांनी रविवारी येथे निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधूर सोडला व पाण्याचे फवारे वापरले. हाँगकाँग शहरासाठी चीन कठोर राष्ट्रीय ...

हाँगकाँग : हाँगकाँग पोलिसांनी रविवारी येथे निदर्शकांना पांगवण्यासाठी अश्रुधूर सोडला व पाण्याचे फवारे वापरले. हाँगकाँग शहरासाठी चीन कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा करणार असून त्याच्याविरोधात हजारो लोक रस्त्यावर आले होते. हाँगकाँगमधील लोकशाहीवादी पाठीराख्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या प्रस्तावावर गेल्या आठवड्यात तीव्र टीका केली होती. या कायद्याने फुटीरवादी आणि घातपाती कारवायांवर तसेच विदेशी हस्तक्षेपावर बंदी घातली जाईल. हाँगकाँग हा चीनचा भूभाग असला तरी निम-स्वायत्त (सेमी अ‍ॅटॉनॉमस) आहे. टीकाकारांचे म्हणणे असे आहे की, ‘एक देश, दोन व्यवस्था’ याविरुद्ध हा कायदा आहे. या ‘एक देश-दोन व्यवस्था’मुळे हाँगकाँग शहराला प्रत्यक्ष चीनमध्ये जे स्वातंत्र्य नाही ते दिले गेलेले आहे. निदर्शक नियोजित कायद्याचा निषेध करण्यासाठी दुपारी कॉजवे बे डिस्ट्रिक्टमध्ये काळ्या कपड्यांत रस्त्यांत जमले होते. ते ‘हाँगकाँगच्या पाठीशी उभे राहा’, ‘हाँगकाँगला मुक्त करा’ आणि ‘आमच्या काळातील क्रांती’ अशा घोषणा देत होते.पोलिसांनी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडण्यापूर्वी निदर्शकांना निळे झेंडे दाखवून निघून जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर केला. किमान १२० लोकांना बेकायदा एकत्र जमल्याबद्दल अटक झाल्याची माहिती पोलिसांनी फेसबुकद्वारे दिली. गेल्या वर्षी लोकशाहीसाठी हाँगकाँगमध्ये चळवळ सुरू झाली.

टॅग्स :chinaचीन