कोरोना व्हायरसमुळे जगभरात 'वर्क फ्रॉम होम' कल्चर वाढले आहे. विशेष करू आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांकडून घरूनच काम करून घेत आहेत. मात्र, या काळात ऑफीसच्या तुलनेत कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव वाढला आहे. हे लक्षात घेत दिग्गज टेक कंपनी गूगलने मोठा निर्णय घेतला आहे.
आता गूगलनेने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवसांचा विकली ऑफ देण्याची घोषणा केली आहे. गूगलच्या या नियमामुळे आता त्यांच्या कर्मचाऱ्यांना केवळ चार दिवसच काम करावे लागणार आहे. गूगलने जगभरात पसरलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून केवळ चारच दिवस काम करायला सांगितले आहे. त्यामुळे आता गूगलमध्ये कार्यरत असलेले सर्वच कर्मचारी केवळ सोमवार ते गुरुवार काम करतील तर शुक्रवार ते रविवारपर्यंत त्यांना विकली ऑफ मिळेल.
यासंदर्भात कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना एक नोट पाठवली आहे. यात लिहिले आहे, 'वर्क फ्रॉम होम'मुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांवर दबाव वाढला आहे.
कंपनीने प्रत्येक विभागातील टीम लीडर्सना आपल्या टीमला मदत करायला सांगितली आहे. तसेच, नव्या व्यवस्थेनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाची जबाबदारी आणि वेळ निर्धारित करण्यात यावा. जर एखादा कर्मचारी विकली ऑफच्या दिवशीही काम करत असेल, तर त्या बदल्यात त्या कर्मचाऱ्याला सोमवारी ऑफ देण्यात यावा, असेही कंपनीने सांगितले आहे.
गूगलचे कर्मचारी जुलै 2021पर्यंत घरूनच काम करणार आहेत. यानंतर कंपनी पुन्हा यासंदर्भात विचार करणार आहे. गूगलच्या 4 वर्किंग डे प्लॅनची सोशल मीडियावर जबरदस्त 'तारीफ' होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
'या' दोन सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी भारी गिफ्ट, एकाच वेळी घेतला मोठा निर्णय
महाराष्ट्र सरकार करणार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी, अध्ययन सुमनची मुलाखत बनली आधार
कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!
खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी