न्यूयॉर्क: अमेरिकेच्या अर्कान्सस राज्यात शिकणाऱ्या दोन मित्रांची गोष्ट सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरली आहे. मैत्री किती घट्ट असू शकते, त्यामुळे एखाद्याचं आयुष्य कसं आणि किती बदलू शकतं, हे यातून दिसून आलं आहे. कॅड्डो हिल्स हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या टॅनर व्हिल्सन आणि ब्रँडन क्वॉल्स यांच्या मैत्रीची चर्चा जगभरात सुरू आहे. आपल्या मित्राला दररोजच्या आयुष्यात होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी टॅनरनं केलेली कृती अनेकांच्या हृदयाला भिडली.टॅनरचा मित्र ब्रँडन दिव्यांग आहे. तो व्हिलचेअर वापरतो. ही व्हिलचेअर खूप जुनी असल्यानं ती ब्रँडनला ढकलावी लागायची. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना, मैदानातून वर्गात येताना, स्वच्छतागृहात जात असताना ब्रँडनला बरेच कष्ट घ्यावे लागतात, ही गोष्ट टॅनरच्या लक्षात आली. यामुळे ब्रँडनचे हात खूप दुखतात. त्याला वेदना होतात, हे टॅनरच्या संवेदनशील मनाला जाणवलं. आपल्या मित्राचा हा त्रास दूर व्हायला हवा, असं त्याला वाटलं. मग त्यानं त्यादृष्टीनं प्रयत्न सुरू केले.
या मैत्रीसाठी थ्री चिअर्स; 2 वर्ष पैसे साठवून मित्रासाठी खरेदी केली इलेक्ट्रिक व्हिलचेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 5:35 PM