सोथबी (कॅनडा), दि. 28 - एक छोटा हिरा खरेदी करायचा म्हटले तरी सर्वसामान्यांची सर्व बचत खर्ची लागू शकते. त्यामुळे डायमंड रिंगमध्ये असलेल्या छोट्या हि-यांचं आपल्यासाठी मोल अनमोल आहे. परंतु, एखादा हिरा टेनिस बॉलच्या आकाराएवढा असल्यास? खरं वाटणार नाही, पण जवळपास एवढ्याच आकाराच्या एका हि-याची नुकतीच विक्री झाली आहे. तब्बल साडेतीनशे कोटी रुपये रुपयांना एका हिरे व्यापा-यानं या हि-याची खरेदी केली आहे.
जगातील दुस-या क्रमांकाचा सर्वांत मोठा हिरा म्हणून त्याला ओळख मिळाली आहे. आकाराने तो जवळपास टेनिस बॉल एवढा आहे. ब्रिटनमधील लॉरेन्स ग्राफ या हिरे व्यापा-याने हा 1109 कॅरेटचा हिरा तब्बल 347 कोटी रुपये देऊन लिलावात विकत घेतला आहे.एवढा मोठा हिरा होता कोणाकडे?- कॅनडाच्या लुकारा डायमण्ड्स कॉर्पोरेशन या कंपनीकडे हा हिरा होता. सध्या तो पैलू न पाडलेल्या स्थितीत आहे.- एवढा मोठा हिरा घेणार कोण, अशी भीती होती, लुकारा डायमण्ड्स कंपनीचे सीईओ आणि प्रेसिडेंट विल्यम लॅम्ब यांना होती.- यापूर्वी एकदा या हि-याचा लिलावही आयोजित करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. मात्र त्यासाठी कोणी खरेदीदार मिळाला नव्हता.- अखेर लॉरेन्स ग्राफ या ब्रिटीश हिरे व्यापाºयाने यासाठी सर्वांत मोठी बोली लावली.- एवढा मोठा हिरा खरेदी करण्याची क्षमता फार कमी व्यापा-यांकडे आहे आणि त्यातही त्याला पैलू पाडण्याचे कसब खूपच थोडक्या लोकांना आहे.- सोथबी येथे झालेल्या लिलावात अखेर ग्राफ यांनी तो खरेदी केला.