वॉशिंग्टन : भारत-चीन सीमेवरून सैनिक मागे हटले तरी तणाव कायम आहे, असे अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात म्हटले आहे.चीन आपले सामर्थ्य वाढविण्याचे तसेच शेजारी देशांना वादग्रस्त भागावर आपल्या दाव्यांसह आपल्या प्राधान्यक्रमाला कोणत्याही विरोधाशिवाय स्वीकार करण्यास विवश करण्यासाठी सर्व मार्गांचा वापर करत आहे.राष्ट्रीय गुप्तचर संचालकांच्या कार्यालयाने (ओडीएनआय) अमेरिकी संसदेला नुकताच आपला अहवाल सादर केला आहे. चीन विदेशात आपली आर्थिक, राजनैतिक व सैन्य अस्तित्वाचा विस्तार करण्यासाठी अब्जावधी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा (बीआरआय) प्रचार करीत राहणार आहे, असे अहवालात म्हटले आहे.चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०१३ मध्ये सत्तेवर आल्यानंतर अब्जावधीचा बीआरआय प्रकल्प सुरू केला होता. अग्नेय आशिया, मध्य आशिया, आखाती क्षेत्र, आफ्रिका व युरोपची जमीन व समुद्री मार्गांना जोडण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.अहवालात म्हटले आहे की, यावर्षी काही सैनिकांच्या वापसीनंतर भारत-चीनचे संबंध तणावपूर्ण बनलेले आहेत. वादग्रस्त सीमा भागांत मे २०२०मध्ये चिनी लष्कराचे अस्तित्व, दशकांमध्ये आतापर्यंत सर्वांत गंभीर तणावपूर्ण स्थितीमध्ये आहे. यामुळे १९७५ नंतर दोन्ही देशांत सीमेवर प्रथमच रक्तरंजित संघर्ष झाला होता. फेब्रुवारीपर्यंत अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांनी वादग्रस्त सीमेच्या काही भागांतून सैन्य तसेच सैन्य उपकरणे हटविली आहेत. चीन आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करीत आहे.चीन हिंद-प्रशांत क्षेत्रात वेगाने सैन्य व आर्थिक प्रभाव वाढवीत आहे. यामुळे क्षेत्रात विविध देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्याचे दक्षिण चीन सागर व पूर्व चीन सागर दोन्हींमध्ये गंभीर क्षेत्रीय वाद आहेत.अहवालात म्हटले आहे की, चीन तैवानच्या एकीकरणासाठी दबाव वाढवत राहील. अमेरिका-तैवान यांच्यातील वाढत्या संबंधांचा निषेध करीत राहील. तथापि, चीन तैवानला एक बंडखोर प्रांताप्रमाणे पाहत आहे. त्याचे एकीकरण झाले पाहिजे व त्यासाठी बळाचा वापर करावा लागला तरी चालेल, असा त्या देशाचा प्रयत्न आहे. अग्नेय आशिया, मध्य आशिया, आखाती क्षेत्र, आफ्रिका व युरोपची जमीन व समुद्री मार्गांना जोडण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे
चीनची लस कूटनीती- चीन लस कूटनीतीद्वारे आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. याअंतर्गत चीन आपल्याला ज्या देशाकडून फायदा घ्यायचा आहेत, त्या देशांना लस उपलब्ध करून देईल.- चीन अमेरिकेच्या तंत्रज्ञान प्रतिस्पर्धेसाठी सर्वांत मोठा धोका असेल. चीनची कम्युनिस्ट पार्टी महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रांत व वाणिज्यिक तसेच सैन्य तंत्रज्ञानाला निशाणा बनवित आहे.- चीन आपल्या तंत्रज्ञानविषयक क्षमता वाढविण्यासाठी गुप्तचर व चोरीसारख्या विविध मार्गांचाही वापर करतो.