दक्षिण चीन समुद्रात सुरु असलेल्या युद्धाभ्यासावेळी अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढू लागला आहे. यावर चीनने आपल्या सैनिकांना नरमाईचे आदेश दिले असून अमेरिकी सैन्य़ावर कोणत्याही परिस्थितीत पहिली गोळी चालवू नका, असे निर्देश दिले आहेत. अमेरिकेचे आरोग्य मंत्री चार दशकांनंतर तैवानच्या दौऱ्यावर असताना चीनचे हे आदेश आले आहेत.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका वृत्तानुसार दक्षिण समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका दोन्ही देश सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत. या साऊथ चायना सीवर चीनची कम्युनिस्ट पार्टी दावा सांगत आली आहे. या वादग्रस्त क्षेत्रात आता अमेरिका सारखा दबाव वाढवत असून अशात दोन्ही अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये युद्ध होण्याचे संकेत आहेत. यामुळे चीन वाढता तणाव कमी करू इच्छित आहे. कारण सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वारे असून कट्टरवादी गट या तणावाचा फायदा घेण्याची भीती चीनला वाटू लागली आहे. असे झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध भविष्यात बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे चीनने त्यांच्या लढाऊ विमानांच्या पाय़लटांना आणि नौसेनेला अमेरिकेच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानांच्या दळणवळणाला प्रतिकार न करण्यासाठी संयम बाळगण्याचे आदेश दिले आहेत.
चीनची सरकारी वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सने अमरिकेच्या युद्धनौकांना भलेही कागदी वाघ म्हटले असेल तरीही सुत्रांनुसार अमेरिका सैन्यासोबत होत असलेल्या संघर्षावरून चीनचे सैन्यही तणावात आहे. चीनने अनेक प्रकारे अमेरिकेला परिस्थिती निय़ंत्रणात ठेवण्यासाठी आमच्याकडून पहिली गोळी झाडली जाणार नाही, असे संदेश पोहोचविण्याचे प्रयत्न केले आहेत.
गेल्या महिन्यात चीनच्या हवाईदलाने अमेरिकेसोबतचा तणाव पाहता हवाई युद्धाच्या तयारीसाठी अभ्यास केला. तर अमेरिकेच्या विमानांनीही या भागात युद्धसराव सुरु केला आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आम्ही रात्रीच्यावेळी समुद्रात लांब पल्ल्याचे बॉम्ब टाकण्याचा अभ्यास केला. यावेळी अनेक डमी लक्ष्य बॉम्बने उडवून देण्यात आले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच कोसळला
Gold Rate : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव
OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन
CoronaVaccine: कोरोना लसीवर रशियाचा शॉर्टकट धोक्याचा; जागतिक तज्ज्ञांचा गंभीर इशारा
पंतप्रधान मोदी लवकरच मोठ्या घोषणा करण्याची शक्यता; हे आहेत अंदाज
खतरनाक Video! WWE मध्ये नव्या सुपरस्टार्सची एन्ट्री; रिंगच तोडल्याने भरली धडकी
चिनी कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे; 1000 कोटींचे हवाला 'घबाड' हाती लागले