मॉस्को : रशियाने जगभरातील देशांची संघटना नाटोसोबत (NATO) आपले संबंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. रशियाचे मंत्री सर्गेई लावरोव यांनी याची घोषणा केली आहे. जागतिक सैन्य कारवाईसाठी बनविण्यात आलेल्या आठ देशांच्या संघटनेतून रशियाला गेल्या आठवड्यात निलंबित करण्यात आले होते. याला प्रत्यूत्तर देण्यासाठी रशियाने हा निर्णय घेतला आहे.
नाटोने म्हटले होते की, रशिया (Russia) गुप्तहेरांच्या मदतीने गोपनिय पद्धतीने आमच्यासोबत काम करत होता. यामुळे रशियातील आपल्या मुख्यालयातील टीम निम्म्यावर आणत आहे. नाटोने 6 ऑक्टोबरला ही कारवाई केली होती. रशियाच्या आठ सदस्यांना अघोषित गुप्तहेर अधिकारी असे म्हटले होते. या गंभीर आरोपांमुळे रशियाने मॉस्कोतील सर्व नाटोची कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नाटोच्या सदस्यांना जर या विषयावर आमच्याशी बोलायचे असे तर आता मॉस्को नाही तर बेल्जिअममधील आमच्या राजदूताशी संपर्क करावा, असे लावरोव यांनी म्हटले आहे.
यामुळे रशियाचे जगातील बडे देश अमेरिका, ब्रिटन सारख्या देशांसोबत संबंध ताणले गेले आहेत. लावरोव यांनी आम्ही नाटोशी असलेली सर्व मिशन बंद करत आहोत. आम्हाला दिखावा करण्याची गरज नाहीय.
नाटोला सैन्य प्रत्यूत्तर देणाररशियन सैन्याने नाटोपासून धोका असल्याचा दावा केला होता. तसेच देशाच्या पश्चिमेकडे 20 नव्या बटालियन तयार करण्याची घोषणा केली होती. संरक्षण मंत्री सर्गेई शोग्यू यांनी ही घोषणा केली होती. अमेरिकेची लढाऊ विमाने, नाटोच्या युद्धनौका रशियन समुद्राजवळ तैनातीवरून रशियाने हे पाऊल उचलले होते.