वॉशिंग्टन- उत्तर कॅलिफोर्नियामधये लागलेल्या वणव्यामुळे 800 घरे नष्ट जाली असून 20 हजार लोकांना त्यामुळे स्थलांतर करावे लागले आहे. आजवरच्या वणव्यांमध्ये हा वणवा 9 व्या क्रमांकाचा सर्वात संहारक वणवा असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमुळे 1 लाख एकर जागेचे नुकसान झाले आहे. या जागेवरील झाडे व पशूपक्षी जळून खाक झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
या आगीमुळे आतापर्यंत 6 लोकांचे प्राण गेले आहेत. या मृतांमध्ये 2 अग्निशमन दलाचे कर्मचारी, 70 वर्षांची एक महिला आणि तिची दोन नातवंडे यांचा समावेश आहे. सहाव्या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या आगीमुळे 19 लोक बेपत्ता असल्याचे सोमवारी स्पष्ट करण्यात आले आहे.