शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

हल्लेखोरांचा खात्मा

By admin | Published: January 10, 2015 2:27 AM

चार्ली हेब्डो साप्ताहिकावर भीषण हल्ला चढवून १२ जणांचा बळी घेणाऱ्या दोन्ही हल्लेखोर भावंडांचा फ्रान्स पोलिसांनी खात्मा केला आहे.

थरारक ओलीस नाट्य संपुष्टात : पॅरिसने सोडला सुटकेचा श्वासपॅरिस : चार्ली हेब्डो साप्ताहिकावर भीषण हल्ला चढवून १२ जणांचा बळी घेणाऱ्या दोन्ही हल्लेखोर भावंडांचा फ्रान्स पोलिसांनी खात्मा केला आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या या तणावाच्या वातावरणातून पॅरिसवासियांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.चार्ली हेब्डोवरील भयानक हल्ला आणि त्यानंतर या हल्लेखोरांनी स्वत:च्या बचावासाठी निरपराध लोकांना ओलीस ठेवल्याने पॅरिस हादरले होते. फ्रान्स पोलिसांसह विशेष पथके सलग तीन दिवसांपासून या हल्लोखोरांच्या मागावर होते. फ्रेंच सुरक्षा दलाने शहर बंद करून पॅरिसवासी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कारवाई हाती घेतली. शुक्रवारी दुपारी दामित्रिन-एन-गोईल उपनगरातील एका प्रिटिंग प्रेसची इमारत स्फोट आणि गोळीबाराच्या फैरींनी हादरले. हल्लेखोर चेरीफ व सईद कौची हे ज्या गोदामात दडी मारून बसले होते, त्या इमारतीला वेढा घातला. गोळीबार व ओलीस नाट्य : पॅरिसच्या पूर्वेकडील कोशेर सुपरमार्केटमध्ये शिरलेल्या एका बंदुकधारीने पाच जणांना ओलीस ठेवले. पोलिसांनी हल्ला केल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. कोशेर सुपरमार्केटचा पोर्त दि व्हिन्सेनेस हा भाग पोलिसांनी सीलबंद केला. या भागाला छावणीचे स्वरूप आले होते. या हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाले.हल्लेखोर होते मृत्यूस तयारच्हल्लेखोर चेरीफ व सईद कौची यांनी आपण मरणास घाबरत नसल्याचे सांगत मृत्यूला सामोरे जाण्याची व मिशनसाठी ‘हौतात्म्य’ पत्करण्याची तयारी दाखविली. च्एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका संशयिताचा पेहराव काळा असून, त्याच्या अंगावर बुलेटप्रूफ जाकीट होते. त्याच्याकडे एके-५६ सारखे स्वयंचलित रायफल होते. या प्रत्यक्षदर्शीने फ्रान्स इन्फो रेडिओला दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी या प्रत्यक्षदर्शीला निघून जाण्यास सांगितले. च्आम्ही निरपराध नागरिकांना मारत नाही असे तो म्हणाला. या इमारतीत लपण्याआधी आरोपीनी जवळच्याच एका महिलेची गाडी चोरली होती. गाडी चोरणारे हे दोघे भाऊ असल्याचे त्याच महिलेने सांगितले.पोलिसांचे एक हेलिकॉप्टरही कारवाईसाठी सज्ज ठेवण्यात आले होते. फ्रेंच कमांडोंनी नियोजनपद्धतीने प्रिटींग प्रेसच्या इमारतीवर चढाई करून त्यांचा खात्मा केला. हल्लेखोरांच्या गोळीबारात एक अधिकारी जखमी झाला आहे.