दक्षिण मेक्सिकोमध्ये भीषण अपघात झाला आहे. लक्झरी बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस ७५ फूट खोल दरीत कोसळली होती. यामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. ओक्साका राज्यातील स्थानिक मिक्सटेका भागात हा अपघात झाला आहे.
राज्याचे अंतर्गत सचिव जेसस रोमेरो या मृत्यूंची पुष्टी केली आहे. यामध्ये सहा महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश आहे. जखमी झालेल्या २० जणांची प्रकृती गंभीर आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती दरीत कोसळली. चालकाकडे अनुभवाचा अभाव आणि थकवा यामुळे हा अपघात झाल्याचे कारण समोर आले आहे. ही बस मेक्सिको सिटीहून गरीब मिक्सटेका प्रदेशातील दुर्गम पर्वतीय गावांकडे जात होती.
एप्रिलमध्ये पश्चिम मेक्सिकोमध्ये एका खडकावर बस आदळून १८ जणांचा मृत्यू झाला होता.