ऑनलाइन लोकमत
जी-२० देशांच्या येथे भरलेल्या शिखर परिषदेत मोदी म्हणाले, हिंसाचाराच्या वाढत्या शक्ती आणि दहशतीने मूलभूत असे आव्हान उभे केले आहे. जे दहशतवादाचे प्रायोजकत्व घेत आहेत वा त्याला पाठिंबा देत आहेत त्यांना वेगळे पाडून त्यांच्यावर निर्बंध आणले पाहिजेत. दहशतवादाला मिळणारा निधी बंद करण्यासाठी जी-२० देशांनी जो पुढाकार घेतला, त्याचे भारत स्वागत करतो. दहशतवाद्यांकडे बँक खाती वा शस्त्रास्त्रांचे कारखाने नसतात. त्यांना कुणीतरी पैसा व शस्त्रास्त्रे पुरवतो.
ब्रिक्स देशांनी दहशतवादाशी केवळ न लढता दहशतवादाला पाठिंबा देऊन त्याचे प्रायोजकत्व करणाऱ्यांना वेगळे पाडण्याचे काम करायला हवे. काही देश दहशतवादाचा वापर सरकारी धोरण असल्यासारखा करतात. भारताचे धोरण दहशतवाद अजिबात मान्य नसल्याचे आहे. या धोरणात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. आमच्यासाठी दहशतवादी हा केवळ दहशतवादीच असतो. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित येऊन दहशतवादाच्या संकटाविरोधात बोलावे आणि तातडीने कृती करावी, अशी भारताची अपेक्षा आहे.