शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अतिरेक्यांचा खातमा

By admin | Published: July 03, 2016 4:32 AM

बांगलादेशातील हॉटेलांत अल्ला हू अकबर असे नारे देत शुक्रवारी गोळीबार करत सुटलेल्या सातपैकी सहा अतिरेक्यांना तेथील सशस्त्र दलाचे जवान व पोलिसांनी शनिवारी सकाळी ठार केले

ढाका : बांगलादेशातील हॉटेलांत अल्ला हू अकबर असे नारे देत शुक्रवारी गोळीबार करत सुटलेल्या सातपैकी सहा अतिरेक्यांना तेथील सशस्त्र दलाचे जवान व पोलिसांनी शनिवारी सकाळी ठार केले आणि एका दहशतवाद्याला जिवंत ताब्यात घेतले. त्यांनी केलेल्या २० परदेशी नागरिक ठार झाले होते. त्यात १८ वर्षांच्या तरुषी जैन या भारतीय मुलीचा समावेश आहे. जखमींमध्येही एक भारतीय डॉक्टर आहे. दहशतवाद्यांनी काल गोळीबार करीत सर्व ग्राहकांना ओलीस धरले होते. ओलिसांमध्ये प्रामुख्याने परदेशी नागरिक आणि विविध देशांच्या दुतावासांतील अधिकारी होते. या सर्व ओलिसांची पोलीस व सशस्त्र दलाच्या जवानांनी शनिवारी सकाळी सुटका केली. त्यासाठी आज सकाळी पोलीस, सशस्त्र जवान आणि कमांडो यांनी एकत्र मिळून मोहीम हाती घेतली. त्यावेळी मोठी धुमश्चक्री झाली. तासभर दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या फैरी झडत होत्या. या काळात किमान १00 स्फोट झाले आणि गोळ्या झाडल्याचे हजारांहून अधिक आवाज ऐकू आले. या मोहिमेत सहा अतिरेकी ठार झाले, तर एकाला जिवंत ताब्यात घेण्यात यश आले. दोन पोलीस अधिकारीही मरण पावले. अतिरेक्यांच्या गोळीबारात किमान ४0 जण जखमी झाले असून, त्यात एका भारतीय डॉक्टराचा समावेश आहे. बांगलादेशात गेल्या काही काळापासून इसिस व अन्य दहशतवादी संघटनांच्या कारवाया सुरू असून, हा हल्ला त्याचाच भाग होता. या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर तसेच बिहार आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दक्षतेचा भाग म्हणून सैन्य आणि सीमा सुरक्षा दलाला सतर्क राहण्याचे आदेश आहेत. इसिसचे अतिरेकी सीमेपाशी येऊन ठेपल्यामुळे सीमा सुरक्षा दलांनी दोन्ही देशांच्या सीमेवर जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे. (वृत्तसंस्था)तरुषी सुट्टीसाठी ढाक्यातअमेरिकेत शिकत असलेली तरुषी इंटर्नशिपसाठी बांगलादेशात आली होती. जैन कुंटुंब मुळचे उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील असून तिचे वडील संजिव जैन यांचा ढाका येथे कपड्यांचा व्यवसाय आहे. हल्ल्यामध्ये ओलीस ठेवलेल्यांत तरुषी होती. दहशतवाद्यांनी तिची हत्या केल्याचे सांगताना मला अतीव दु:ख होत आहे, असे टष्ट्वीट परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केले.भारताला दु:ख : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना दूरध्वनी करून ढाक्यातील जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. भारत संकटाच्या या काळात बांगलादेशसोबत ठामपणे उभा असल्याचे यावेळी ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून, मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.भारताचे बारीक लक्ष : ओलीस संकटावर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. बांगलादेश सुरक्षा दलाने ओलीस नाट्य संपविण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेबाबत वेगवेगळी माहिती समोर येत असल्यामुळे भारत वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले.