पॅरिस : पैगंबरांच्या कार्टून वादाने आता हिंसक वळण घेतले असून फ्रान्समध्ये शिक्षकाचा गळा चिरून हत्येनंतर आणखी एक अशाचप्रकारच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. फ्रान्सच्या एका चर्चमध्ये हल्लेखोराने एका महिलेचा गळा चाकूने कापला. तसेच अन्य दोन लोकांवर चाकूने वार करून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना फ्रान्सच्या नाईस शहरात झाली आहे. शहराच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले.
महापौर क्रिस्चियन इस्तोर्सी यांनी सांगितले की, चाकूहल्ला झालेली ही घटना शहरातील नोट्रे डॅम चर्चमध्ये झाली आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. तसेच तीन लोकांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. अन्य काही लोक जखमी झाले आहेत. महिलेचा गळा कापण्यात आल्याचे फ्रान्सच्या एका नेत्यानेही सांगितले आहे.
फ्रान्सच्या दहशतवाद विरोधी पथकाने सांगितले की, या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे. घटनास्थळी सशस्त्र जवानांनी चर्चला घेराव घातला आहे. अँम्बुलन्स आणि फायर सर्व्हिसच्या गाड्या घटनास्थळी आल्या आहेत. हा हल्ला जेव्हा झाला त्या आधी काही वेळ एका शिक्षिकेची गळा चिरून हत्या करण्यात आली.
चाकू हल्ला करण्यामागे नेमके कारण समजू शकलेले नाही. सध्या तेथे पैंगबर कार्टून वाद सुरु आहे. या हल्लामागे हा वाद असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या दिशेने तपास सुरु करण्यात आला आहे. शिक्षिकेच्या हत्येनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमैनुअल मॅक्रो यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्माचा उपहास करण्याच्या अधिकाराचे जोरदार समर्थन केले होते. यानंतर ते मुस्लिम देशांच्या टीकेचे धनी झाले होते.
राजदूत मागे बोलावण्यावरून पाकिस्तानचे हसे
पाकिस्तानने आज पुन्हा एकदा जगभरात आपले हसे करून घेतले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी इस्लामिक दहशतवादावर एक वक्तव्य केले होते. यावरून मुस्लिम राष्ट्रांनी निषेध व्यक्त केला. पाकिस्ताननेही संसदेत निषेध प्रस्ताव मांडला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी आणखी एक प्रस्तावा देत म्हटले की, फ्रान्समधील पाकिस्तानी राजदूताला माघारी का बोलवू नये.
धक्कादायक म्हणजे पाकिस्तानच्या संसदेत या प्रस्तावावर बहुमताने संमती देण्यात आली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इंसाफसह विरोधी पक्षांना एकमुखाने प्रस्तावाला होकार दिला. इथेच त्यांची फजिती झाली. गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तानचा फ्रान्समध्ये कोणीही राजदूत नेमलेला नाही. यावरून परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांना त्यांच्या मंत्रालयाचे किती ज्ञान आहे हे दिसून आले.