इस्लामाबाद : जागतिक दहशतवादी म्हणून घोषित झालेला पाकिस्तानमध्ये राहणारा दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानच्या गुजरावाला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्याचे प्रकरण पाकिस्तानातील गुजरातमध्ये हलविण्यात आले आहे. ही माहिती पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
पाकिस्तानच्या अमेरिकेने मुसक्या आवळल्यानंतर दहशतवाद्यांना शरण देत नसल्याचे दाखविण्यासाठी पाकिस्तानने गेल्या महिन्यात 18 जुलैला लाहोरमध्ये अटक केली होती. त्याला तुरुंगात पाठविण्यात आले होते. त्याच्यावर दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने केली होती. भारताने हे नाटक असल्याचा आरोप केला होता. ट्रम्प यांनीही या कारवाईचे श्रेय घेतले होते. मात्र, अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे डोळे उघडत आधीचे प्रकार सांगितले होते.
जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अनेकदा अटक करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई जुजबी होती. हाफिजला लष्करी अधिकारी, मंत्र्यांच्या बंगल्यावर ठेवण्याच येत होते. आणि त्याला पंचतारांकीत सुविधा देण्यात येत होत्या. काही दिवसांनी त्याला जामिनावर सोडूनही देण्यात येत होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मदतीसाठी अमेरिकेला गेले होते. यावेळी ट्रम्प यांच्यासमोर त्यांनी पाकिस्तानात 40 हजारांवर दहशतवादी वावरत असल्याचे मान्य केले होते. अमेरिकेच्या संसद सदस्यांनी याच मुद्द्यावरून पाकि्तानला मिळणारी लाखो डॉलरची मदत थांबविली होती.
हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास चीनने आडकाठी घातली होती. भारत यासाठी प्रयत्नशील होता. अखेर चीनने दबावापुढे नमते घेतले होते. याच सईदने मुंबईवरील 26/11 चा हल्ला घडविला होता. यानंतर ही त्याने मोठमोठे हल्ले घडवून आणले होते. 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ला घडवून 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. यानंतर भारताने हवाई हल्ला करत पाकिस्तानातील जैशचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.