Hafiz Saeed Close Aide Murder: गेल्या काही काळापासून पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या अनेक दहशतवाद्यांचा एकामागून एक खात्मा करण्यात आला आहे. आता भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या जवळच्या मित्राची कराचीत हत्या करण्यात आली. लष्कर-ए-तैयबासाठी निधी जमा करणाऱ्या अब्दुल रहमानवर कराचीमध्ये अज्ञातांनी गोळीबार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.
हल्ल्यात अब्दुल रहमानचे वडीलही जखमीअब्दुल रहमान हा अहल-ए-सुन्नत वाल जमातचा स्थानिक नेता असल्याचे सांगण्यात येत आहे. तो कराचीत लष्करसाठी निधी गोळा करायचा. त्याचे एजंट सर्व भागातून निधी आणायचे आणि त्याच्याकडे जमा करायचे, त्यानंतर तो हाफिज सईदला निधी पोहोचवत असे. गोळीबारात अब्दुल रहमानचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या वडिलांसह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
क्वेट्टा येथे मुफ्ती यांची गोळ्या झाडून हत्यागेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान दहशतवादाने त्रस्त आहे. एकीकडे बीएलए आणि तेहरीक-ए-तालिबान बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराला टार्गेट करत आहेत. तर दुसरीकडे एकामागून एक दहशतवादी मारले जाताहेत. अलीकडेच जमियत-उलेमा-ए-इस्लामचे मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई याची क्वेट्टा येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. क्वेटा विमानतळाजवळ नूरझाई याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
लष्कराचा टॉप कमांडर मारला गेलाअब्दुल रहमानच्या आधी लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर झिया-उर-रहमान उर्फ नदीम उर्फ कटल सिंधी याची पंजाब प्रांतातील झेलम भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नदीम हा लष्कराचा संस्थापक हाफिज सईदचा विश्वासू सहकारी मानला जात होता. जम्मू-काश्मीरमधील पुंछ-राजौरी भागात दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता.