कुख्यात दहशतवादी आणि मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड हाफिझ सईद याच्या निकटवर्तीची हत्या झाली आहे. सईदचा निकटवर्तीय असलेल्या मुफ्ती कैसर फारुख याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली. हल्लीच हाफिझ सईदच्या मुलाचं अपहरण झाल्याचं वृत्त आलं होतं. दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि हाफिझ सईदचा जवळचा सहकारी असलेल्या मुफ्ती कैसर फारुख याची कराचीमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. मात्र आतापर्यंत कुठलीही संघटना किंवा एजन्सीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हल्लीच पाकिस्तानी दहशतवादी हाफिझ सईदबाबत धक्कादायक दावा करण्यात आला होता. हाफिझ सईदच्या मुलाचं अपहरण झाल्याचा दावा करण्यात येत होता. पाकिस्तानमधील गुप्तहेर यंत्रणा सईदच्या मुलाचा शोध घेत असल्याचा दावा करण्यात येत होता. दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर ए तोयबाला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेला हाफिझ सईद हा टार्गेटवर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, करण्यात येत असलेल्या दाव्यांनुसार हाफिझ सईदचा मुलगा तल्हा सईद याचं अपहरण झालं आहे. पेशावरमध्ये काही लोक त्याला जबरदस्तीने उचलून घेऊन गेले. त्यामुळे दहशतवाद्यांमध्ये खळबळ उडालेली आहे. आता पुढचा नंबर हाफिझ सईदचा असू शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे. हाफिझ सईदच्या मुलाच्या अपहरणाचे वृत्त आल्यापासून दहशतवाद्यांमध्ये खळबळ माजलेली आहे. मात्र हाफिझ सईद आणि त्याच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आल्याही ही काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी २०२१ मध्ये हाफिझला लक्ष्य करण्यात आले होते. २०२१ मध्ये हाफिझ सईदच्या घराजवळ स्फोट झाला होता. तेव्हा हाफिझ सईद हा त्याच्या घरात उपस्थित होता.