ऑनलाइन लोकमत
मुझफ्फराबाद, दि.6 - पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी दहशतावाद्यांविरोधात आंदोलन पुकारले आहे. 'दहशतवाद बंद करा, दहशतवाद मुर्दाबाद', अशी घोषणाबाजी करत स्थानिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मुझफ्फराबाद, कोटली, मीरपूर, गिलगिट, दायमर आणि नीलम खोऱ्यातील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमुळे आमचे आयुष्य नरक बनले आहे. सततच्या होणा-या दहशतवादी कारवायांमुळे येथील लोकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे, असा संताप व्यक्त करत दहशतवादी तळांमुळे राहते ठिकाण उद्ध्वस्त झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
#WATCH Local people and leaders in various parts of PoK protest against terror camps which they confirm are thriving there. pic.twitter.com/1qR5LHJnQD— ANI (@ANI_news) October 6, 2016
पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेद्वारे दहशतवाद्यांना रसद पुरवली जाते,असा आरोप देखील यावेळी स्थानिकांनी केला आहे. जर प्रशासनाकडून दहशतवाद्यांविरोधात ठाम भूमिका मांडण्यात आली नाही, तर आम्ही याविरोधात योग्य ती कृती अमलात आणू, असा इशारा येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरमधील जनता दहशतवाद्यांचे तळ हटवण्याची मागणी करत आहेत, मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष केल जात असल्याचे आरोप स्थानिकांनी केला आहे.