सॅन अँटोनिया
अमरिकेतील टेक्सास राज्यात सॅन अँटोनिया शहराच्या सीमेजवळ एका ट्रकमध्ये तब्बल ४२ मृतदहे आढळल्यानं खळबळ उडाली आहे. हे लोक स्थलांतरित असल्याची माहिती समोर आली आहे.
टेक्सासमधील स्थानिक वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार ट्रकमध्ये १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सेंट अँटोनिया शहराजवळील रेल्वे रुळाजवळ एका भल्या मोठ्या ट्रकमध्ये हे मृतदेह सापडले आहेत. ट्रकचा चालक बेपत्ता आहे. पोलीस संपूर्ण घटनेची चौकशी करत आहेत. टेक्सासचे गर्व्हनर ग्रेग अबट यांनी घटनेची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांना दिली आहे. सेंट अँटिनियो टेक्सासमध्ये असून ते अमेरिका आणि मेक्सिसोच्या सीमेपासून २५० किमी अंतरावर आहे.
घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तसेच इतर सेवा दाखल झाल्या आहेत. सॅन अँटोनियोचे पोलीस प्रमुख विल्यम मॅकमॅनस यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा तपास आता फेडरल एजन्सीकडे सोपवण्यात आला आहे आणि तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
टेक्सासचे रिपब्लिकन गव्हर्नर ग्रेग अबट यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांना मृत्यूसाठी जबाबदार धरलं आणि "सीमा सताड उघड्या ठेवण्याचे परिणाम", असं या घटनेचं वर्णन केलं आहे.