बँकॉक - कोरोना व्हायरसमुळे जगातील जवळपास सर्वच बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. पार्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या थायलंडमध्येही सध्या शांतता पसरलेली आहे. बँकॉकपासून ते पटायापर्यंतचे सर्वच नाईट क्लब आणि मसाज पार्लर्स बंद आहेत. टूरिस्ट्सदेखील येणे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत, यांच्याच माध्यमाने जे सेक्स वर्कर्स आपले घर चालवतात ते आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत. आकड्यातच बोलायचे तर या महामारीमुळे जवळपास 3,00,000 सेक्स वर्कर्स बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे यांच्यावर आता ग्राहक शोधण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
एएफपी या वृत्त संस्थेशी बोलताना, एका सेक्स वर्करने म्हटले आहे, की त्यांना व्हारसची तर भीती आहेच, पण घरभाडे आणि पोटाच्या व्यवस्थेसाठी ग्राहक शोधनेही तेवढेच आवश्यक आहे. थायलंडमध्ये बार रेस्टॉरंट बऱ्याच दिवसांपासून बंद आहेत. आणि आता रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 4 वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे.
येथील अधिकांश सेक्स वर्कर्स बारमध्येच काम करायचे आणि नंतर ग्राहकांसोबतच निघून जात होते. मात्र, आता बार बंद झाल्याने त्यांना रस्तायवरच ग्राहकांची वाट पाहावी लागत आहे. आणखी एका सेक्स वर्करने सांगितले, की पूर्वी दर आठवड्याला 300 ते 600 डॉलर मिळायचे. आता उद्योग बंद झाल्याने ही मिळकत बंद झाली आहे. घराचे भाडेही न देता येणे त्यांच्यासाठी मोठी समस्या आहे.
सेक्स वर्क्सना आधिच धोका असतो. मात्र, आता या व्हायरसमुळे तो अधिकच वाढला आहे. येथील सरकार तीन महिन्यांपर्यंत बेरोजगार झालेल्यांना भत्ता देणार आहे. मात्र, या सेक्स वर्क्सचे काय? यासाठी एम्पावर फाउंडेशन नावाच्या एका संस्थेने यांनाही मदत करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे.
थायलंडचा राजा प्रजेला संकटात टाकून पळाला -
तत्पूर्वी, थायलंडचे वादग्रस्त राजे व्हॅजिरालाँगकॉर्न ऊर्फ राम दशम कोरोना व्हायरसच्या संकटात जनतेला सोडून जर्मनीला निघून गेले आहेत. जर्मनीच्या आलिशान हॉटेलला त्यांनी आपला बालेकिल्ला बनवले असून, स्वतःसोबत २० महिलांनाही तेथे नेले आहे. त्यासुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहेत. तसेच ते नोकरांनाही सोबत घेऊन गेले आहेत.