कराची : गेल्या आठवड्यात पाकिस्तानात कराची विमानतळावर झालेल्या आत्मघाती बाॅम्बस्फाेटामध्ये विदेशी दहशतवाद्यांचा हात असून, पाकिस्तान व चीनचे संबंध बिघडविण्यासाठी हा हल्ला करण्यात आला हाेता, असा दावा पाकिस्तानच्या दहशतवाद विराेधी पथकाने (सीटीडी) केला आहे. यामुळे देशातील वातावरण पुर्णपणे ढवळून निघाले होते.
गेल्या रविवारी झालेल्या स्फाेटात दाेन चिनी कामगारांसह १७ जणांचा मृत्यू झाला हाेता. यासंदर्भात दहशतवादविराेधी न्यायालयात सीटीडीने सांगितले की, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या आत्मघाती हल्ल्यात सहभागी आहे.
अनाेळखी दहशतवाद्याने चिनी कामगारांच्या ताफ्याजवळ स्फाेटांनी भरलेली गाडी उभी केली हाेती. यासाठी विदेशी गुप्तचर संस्थेची त्यांना मदत झाली, असा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात ७० ते ८० किलाे स्फाेटकांचा वापर झाला हाेता. सुमारे ६० अब्ज डाॅलरच्या चीन-पाक आर्थिक काॅरिडाेरसाठी हजाराे चिनी कामगार काम करीत आहेत. या स्फोटामुळे सर्वांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता.