रशियाच्या S-400 संरक्षण यंत्रणेचा 'फुगा' फुटला! युक्रेनने उद्ध्वस्त केलं रशियन 'ब्रह्मास्त्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 03:03 PM2024-06-13T15:03:20+5:302024-06-13T15:03:51+5:30

S-400 प्रणाली ही जगातील सर्वोत्कृष्ट संरक्षण कवच प्रणाली असल्याचा रशियाचा दावा रशियाचा

The 'bubble' of Russia's S-400 defense system burst! Ukraine destroyed the Russian Brahmastra | रशियाच्या S-400 संरक्षण यंत्रणेचा 'फुगा' फुटला! युक्रेनने उद्ध्वस्त केलं रशियन 'ब्रह्मास्त्र'

रशियाच्या S-400 संरक्षण यंत्रणेचा 'फुगा' फुटला! युक्रेनने उद्ध्वस्त केलं रशियन 'ब्रह्मास्त्र'

 

Russia Ukraine War Update: रशिया आणि युक्रेनमधील युद्धात आता रशियन शस्त्रास्त्रांची लढाऊ क्षमता समोर येत आहे. क्रिमियाच्या सुरक्षेसाठी तैनात रशियन S-400 हवाई संरक्षण कवच भेदण्यास युक्रेनच्या सैन्याने सुरुवात केली आहे. युक्रेनियन लष्कर अमेरिकेने पुरवलेल्या ATACMS रॉकेटचा वापर करत आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, मे महिन्यात युक्रेनच्या लष्कराने सेवस्तोपोल, क्रिमियाच्या बाहेर बेल्बेक येथे असलेल्या रशियन तळावर १० आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम रॉकेट्सचा हल्ला केला. यामध्ये S-400 प्रणालीचे दोन लाँचर्स आणि एक रडार नष्ट करण्यात आले. एवढेच नाही तर तेथे तैनात असलेली ४ लढाऊ विमाने उद्ध्वस्त केल्याचे वृत्त आहे.

S-400 प्रणाली ही जगातील सर्वोत्कृष्ट संरक्षण कवच प्रणाली असल्याचा दावा रशिया करत असते. आतापर्यंत रशियाचा दावा होता की S-400 अभेद्य आहे आणि ते नष्ट केले जाऊ शकत नाही, परंतु आता ही हवाई संरक्षण यंत्रणा अमेरिकन क्षेपणास्त्रांसमोर अपयशी ठरताना दिसत आहे. पण अहवालात म्हटले आहे की, दोन टन वजनाच्या या अमेरिकन रॉकेट सिस्टममध्ये हजारो ग्रेनेडच्या आकाराचे बॉम्ब होते, ज्यामुळे S-400 सिस्टमचे बरेच नुकसान झाले. बेल्बेक आणि सेवास्तोपोल हे दोन्ही रशियन हवाई दलाचे सर्वात महत्त्वाचे हवाई तळ आहेत. या हल्ल्यानंतर लगेचच, रशियन सैन्याने नष्ट झालेल्या S-400 च्या जागी दुसरी यंत्रणा तैनात केली.

युक्रेनच्या लष्कराने या यशानंतर मंगळवारी पुन्हा एकदा बेल्बेकमध्ये S-400 प्रणाली नष्ट केली. अहवालानुसार, ताज्या हल्ल्यात अमेरिकन M39A1 ATACMS चाही वापर करण्यात आला. या हल्ल्यात S-400 व्यतिरिक्त युक्रेनच्या लष्कराने आणखी दोन हवाई संरक्षण यंत्रणादेखील नष्ट केल्या. यात S-300 प्रणाली आहे. युक्रेनियन सैन्याने नोंदवले की किमान 10 ATACMS क्षेपणास्त्रे वापरली गेली. त्यांनी सांगितले की, परिस्थिती अशी होती की रशिया एकही रॉकेट पाडण्यात यशस्वी झाला नाही.

Web Title: The 'bubble' of Russia's S-400 defense system burst! Ukraine destroyed the Russian Brahmastra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.