अमेरिका आणि भारतादरम्यान चीनच्या मुद्द्यावरून संबंध सुधारु लागले आहेत. व्हाया व्हाया पाठविली जाणारी गुप्त माहिती आता अमेरिकेचे सैन्य थेट भारतीय सैन्याला पाठवू लागले आहे. गलवान सारखाच प्रसंग गेल्या वर्षी अरुणाचलप्रदेशमध्ये होणार होता, परंतू अमेरिकेने ऐन क्षणी घात लावून बसलेल्या चिनी सैनिकांची माहिती पुरविल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
चीनचे सैनिक अरुणाचलमध्ये भारतीय सैनिकांची वाट पाहत लपले होते. अमेरिकेने या सैनिकांची संख्या, त्यांच्याकडील शस्त्रे आणि लोकेशन आदी माहिती भारतीय सैन्याला थेट दिली. यामध्ये उच्च क्लालिटीची सॅटेलाईट फोटोदेखील होते. यामुळे भारतीय सैनिक सावध झाले होते. चिनी सैनिकांसोबत झटापट झाली परंतू कोणी शहीद झाल नाही. जखमी झाले होते. अमेरिकेने एवढी गुप्त माहिती तातडीने शेअर करणे हे इतिहासात पहिल्यांदाच घडले होते.
यूएस न्यूजने याची माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशमधील झटापटीवर नजर ठेवलेल्या अधिकाऱ्याचा हवाला देण्यात आला आहे. अमेरिकेने पहिल्यांदाच भारताचा चिनी सैन्याच्या ताकदीचा रिअल टाईम माहिती दिली होती. अमेरिकेने त्यांचे सॅटेलाईट भारत चीन सीमेवर वळविले होते. अशी गुप्त माहिती अमेरिका यापूर्वी अनेक माध्यमांतून देत होती, परंतू ती भारताकडे पोहोचण्यास वेळ लागत होता. ९ डिसेंबरला ही झटापट झाली होती.
अमेरिकेच्या या अधिकाऱ्याने सांगितले की, चिनी सैनिक घात लावून वाट पाहत होते. अमेरिकेच्या हे लक्षात आले आणि भारताला सावध करण्यात आले. यासाठी सरकारला नाही तर भारतीय लष्कराच्या समकक्ष अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला होता. अशाप्रकारे गुप्त माहिती वेळेवर पोहोचली तर मोठ्यातली मोठी घटना टाळता येऊ शकते, हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.
गलवानमध्ये सपशेल हरलेला चीन अरुणाचल प्रदेशमध्ये भारताची तयारी तपासण्यासाठी असे करत होता. पेंटागॉनमध्ये प्रादेशिक समस्या हाताळणारे यूएस संरक्षण विभागाचे माजी अधिकारी विक्रम सिंग म्हणाले की, चीनने हल्ला केला तर भारताची प्रतिक्रिया कशी असेल आणि काय करेल याची तपासणी पीएलए करत होता. ही सर्व भविष्यातील चीनसोबतच्या संघर्षाची तयारी होती, असाही इशारा त्यांनी दिला.