लंडन : अब्जाधीश भारतीय परिवार हिंदुजातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता असून, परिवारातील सदस्यांकडून नवीन खटले दाखल होऊ शकतात. परिवाराचे पालक श्रीचंद हिंदुजा यांच्या वतीने लंडनच्या न्यायालयात ही माहिती देण्यात आली.
जगभरात बँकिंगपासून रसायने व आरोग्यापर्यंत विविध क्षेत्रात हिंदुजा परिवाराचे औद्योगिक साम्राज्य पसरले आहे. संपत्तीच्या वाटणीवरून परिवारात अनेक दिवसांपासून वाद सुरू असून, विविध न्यायालयात खटले दाखल आहेत. गेल्यावर्षी परिवारात वाद मिटविण्यावर सहमती झाली होती. जूनमध्ये हिंदुजांच्या वकिलांनी न्यायालयात या सहमतीची माहिती दिली होती. सर्व खटले संपविण्याचा निर्णय परिवारातील सदस्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले होते. आता या सहमतीस पुन्हा तडा जाण्याची शक्यता आहे. श्रीचंद हिंदुजा यांच्या वकिलाने न्यायालयास सांगितले की, 'वाद मिटलेले नसून, आणखी खटले दाखल होऊ शकतात.'
म्हणून झाले मतभेद
८७ वर्षीय श्रीचंद हिंदुजा यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे. त्यामुळे समूहाचा कारभार कोणी पहायचा यावरून परिवारात मतभेद निर्माण झाले आहेत. श्रीचंद यांच्या मुली विनू आणि शानू यांच्या नावे असलेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीच्या वैधतेला श्रीचंद यांचे धाकटे बंधू गोपीचंद हिंदुजा (८३) यांनी आव्हान दिले आहे