गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. इस्त्रायलने हमासवर जोरदार हल्ले सुरू केले आहेत, अनेकांचा यात मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इशारा दिला आहे. बराक ओबामा म्हणाले की, गाझामधील इस्रायलच्या काही कृती, जसे की अन्न आणि पाणी तोडणे, पिढ्यान्पिढ्या पॅलेस्टिनी लोकांची वृत्ती कठोर करू शकते. एवढेच नाही तर त्यामुळे इस्रायलचा आंतरराष्ट्रीय पाठिंबा कमकुवत होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.
तळागाळातील लोकांबाबत न्यायव्यवस्थेचे चुकलेच!; CJI चंद्रचूड यांनी दाखवला आरसा
"युद्धाच्या मानवी खर्चाकडे दुर्लक्ष करणारी कोणतीही इस्रायली लष्करी रणनीती प्रतिकूल असू शकते." गाझामधील लोकांसाठी अन्न, पाणी आणि वीज खंडित करण्याच्या इस्रायली सरकारच्या निर्णयामुळे केवळ मानवतावादी संकट वाढण्याचा धोका नाही, तर यामुळे पॅलेस्टिनी वृत्ती पिढ्यानपिढ्या आणखी कठोर होऊ शकते, ज्यामुळे इस्रायलसाठी जागतिक समर्थन कमी होऊ शकते, असंही बराक ओबामा यांनी म्हटले आहे.
७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये १४०० लोकांचा मृत्यू झाला होता. हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून गाझा पट्टीवर बॉम्बफेक सुरूच आहे. इस्रायल गाझामध्ये काही ठिकाणी हवाई हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ५००० पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. ओबामा यांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध केला आणि अशा युद्धांमध्ये नागरिकांना होणाऱ्या धोक्यांबाबत इशारा दिला. त्यांनी इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना ओबामा यांनी गाझामधील हमासविरुद्धच्या लढाईत इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन केले आहे. मात्र, हवाई हल्ल्यातील मृत्यूंची वाढती संख्या पाहता त्यांनी इस्रायलला संयम बाळगण्याचे आवाहन केले.
गाझा हा ४५ किमी लांबीचा भूभाग आहे. येथे सुमारे २३ लाख लोक राहतात. इराण समर्थित हमास देखील येथे २००७ पासून राजकीय दृष्ट्या राज्य करत आहे. पण हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत नाकेबंदी लागू केली. ओबामा यांच्या अध्यक्षतेच्या काळात अमेरिकन प्रशासनाने इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यात शांतता करार घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न फसला. तर जो बायडेन यांनी २०२१ मध्ये अध्यक्ष झाल्या पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला नाही.
बायडेन प्रशासनाचा दावा आहे की, दोन्ही बाजूंनी ठाम भूमिका घेतली आहे. ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना ओबामा आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात तणावपूर्ण संबंध होते. ओबामा प्रशासन इराणशी अणु करारावर बोलणी करत होते. तत्कालीन उपराष्ट्रपती असताना, बायडेन यांनी अनेकदा दोघांमध्ये मध्यस्थ म्हणून काम केले.