नवी दिल्ली : हात तुझा हातात अन् धुंद ही हवा। रोजचाच चंद्र आज भासतो नवा नवा असे प्रेमीयुगुल ज्याच्या साक्षीने एकमेकांना साद घालतात तो चंद्र पृथ्वीपासून दूर जात आहे. त्यामुळे पृथ्वीला विरह जाणवणार की नाही याची कल्पना नाही. मात्र चंद्राच्या दूर जाण्याने पृथ्वीवरील दिवसाचा कालावधी २४ ऐवजी २५ तासांचा होण्याची शक्यता एका नव्या संशोधनाच्या निष्कर्षांतून वर्तविण्यात आली आहे.
या विद्यापीठात झालेले संशाेधन चंद्राने गेल्या अनेक शतकांपासून कलाकार, कवी, लहान मुले, प्रेमिकांना नेहमीच प्रेरणा दिली आहे. चंद्र हा प्रत्येकाचा सखा, मित्र आहे. त्याला कोणीही ज्येष्ठ व्यक्ती वगैरे मानत नाही.
चंद्राचा साहित्यात, बोलीभाषेत, लोकांच्या रोजच्या संभाषणात एकेरी उल्लेखच अधिक आढळतो. अशा या चंद्राबाबत अमेरिकेतील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नुकतेच संशोधन केले.
९ कोटी वर्षांपूर्वीच्या एका दगडाचा या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. चंद्राची व्युत्पत्ती कशी झाली याच्या अभ्यासासाठी नव्या संशोधनातले निष्कर्षही उपयोगी ठरणार आहेत.
- ३,८४,४०० किलाेमीटर एवढे अंतर पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये आहे.- १.४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दिवसाचा कालावधी १८ तासांहून अधिक होता. मग त्यात काही कोटी वर्षांत वाढ होत राहिली.- यापुढील कोट्यवधी वर्षांत हीच प्रक्रिया तशीच सुरू राहील व दिवस २५ तासांचा होईल. - पृथ्वीभोवती भ्रमण करणारा चंद्र तिच्यापासून दूर जात राहिल्यास त्याचे काय परिणाम होतील, याचाही अभ्यास अमेरिकेतील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील संशोधक करत आहेत.
पृथ्वीवरील दिनमानावर परिणाम- विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून अंदाजे ३.८ सेंटिमीटर इतके अंतर दूर जात आहे. - त्यामुळे पृथ्वीवरील दिनमानावर त्याचा परिणाम होणार आहे. या घडामोडींमुळे पृथ्वीवरील एका दिवसाचा कालावधी एक तासाने वाढेल. म्हणजे तो २४ ऐवजी २५ तासांचा होईल.- ज्यावेळी हा बदल होईल त्यावेळी जगभरातील घड्याळे व वेळेशी संबंधित सर्व परिमाणे बदलावी लागणार आहेत.