शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जगातली सर्वांत सुंदर ट्रक ड्रायव्हर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 7:03 AM

आजही हे क्षेत्र फक्त पुरुषांचं मानलं जातं. त्यात आव्हानं खूप आहेत, कष्टही खूप आहेत, तरीही जगभरात बोटावर मोजता येण्याइतक्या महिलांनी याही क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. 

कोणती कामं पुरुषांनी करावीत, कोणती कामं स्त्रियांनी करावीत? एकमेकांनी दुसऱ्यांच्या कोणत्या कामांबाबत हस्तक्षेप करू नये?... पूर्वी याबाबत अतिशय कडक असे संकेत होते. कालांतराने हे संकेत मोडत गेले. मुख्यत: महिलांनी स्वबळावर आणि स्वकष्टानं हे संकेत मोडून काढले आणि पुरुषप्रधान क्षेत्रातही आपलं नाव कोरायला सुरुवात केली. आज तर असं एकही क्षेत्र नाही, ज्यात महिलांनी आपलं पाऊल रोवलेलं नाही, तरीही संकेत मात्र तेच जुने-पुराणे आहेत.. ‘अमुक अमुक’ क्षेत्रात महिलांनी पुरुषांची बरोबरी करू नये किंवा त्यात बळजबरी घुसू नये..

यातलंच एक क्षेत्र आहे ट्रक ड्रायव्हिंग! आजही हे क्षेत्र फक्त पुरुषांचं मानलं जातं. त्यात आव्हानं खूप आहेत, कष्टही खूप आहेत, तरीही जगभरात बोटावर मोजता येण्याइतक्या महिलांनी याही क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. 

ऑस्ट्रेलियाची ब्लेझ विल्यम्स ही त्यातली एक महत्त्वाची ट्रक ड्रायव्हर. संपूर्ण जगभरात आज तिचं नाव आहे. सोशल मीडियावर तर ती अक्षरश: झळकत असते. ट्रक ड्रायव्हिंगमध्ये तर ती निष्णात आहेच; पण तिचं सौंदर्य हा सध्या मोठा चर्चेचा विषय आहे. तिचे कुरळे साेनेरी केस, निळे डोळे, कोणीही फिदा व्हावं अशी फिगर.. मॉडेल किंवा अभिनेत्री म्हणून सहज कुठेही काम मिळू शकेल असं तिचं सौंदर्य असतानाही दिवसातले बारा-तेरा तास ती ट्रकच्या व्हीलमागे बसलेली असते. सध्या सोशल मीडियावर ती फारच व्हायरल आहे.

दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेड येथील ब्लेझला लहानपणापासूनच वाहनांचं मोठं आकर्षण होतं. त्यातही ट्रकसारख्या अवजड वाहनांच्या तर ती प्रेमातच होती. त्यामुळे तिनं मोठं झाल्यावर ट्रक ड्रायव्हरच व्हायचं ठरवलं आणि तशी ती झालीही. बऱ्याचदा दिवसातून बारा-चौदा तास ट्रक ड्रायव्हिंग करावं लागलं, त्यात प्रचंड शारीरिक आणि मानसिक थकावट झाली, तरीही हे काम ब्लेझला मनापासून आवडतं. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून ती ट्रक ड्रायव्हिंग करते आहे. त्यापासून ती चांगला पैसाही  कमावते. 

सर्व काही व्यवस्थित सुरू असताना २०१८ मध्ये तिच्या एका पायावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे तब्बल १६ महिने तिला ड्रायव्हिंगपासून दूर राहावं लागलं. यामुळे पोटापाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. काय करावं असा विचार करीत असतानाच तिच्या एका मित्रानं तिला ‘ओन्ली फॅन्स’ या वेबसाइटवर जॉइन व्हायला सांगितलं. 

आपल्या अनोख्या व्यवसायामुळे ब्लेझ सुरुवातीपासून सोशल मीडियावर प्रसिद्ध होतीच. पण, ‘ओन्ली फॅन्स’ या वेबसाइटवर तिनं आपले फोटो आणि व्हिडिओ टाकायला सुरुवात केल्यानंतर, ते विकायला सुरुवात केल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत झपाट्यानं वाढ झाली. पण तिची लोकप्रियता, फॅन्स जसे वाढले, त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या टीकेलाही तिला सामोरं जावं लागलं. आपले  फोटो विकून सवंग लोकप्रियता मिळवत असल्याची टीका, विशेषत: तरुणांनी तिच्यावर केली. आपला ट्रक ड्रायव्हिंगचा जॉब आणि सोशल मीडियावर आपले फोटो टाकण्याचा उद्योग.. दोन्ही गोष्टी तिनं सोडाव्यात, असा ‘सल्ला’ तिला अनेकांनी दिला. तिच्यावर टीका करण्यात महिलांची संख्या जास्त आहे. आपण महिला असतानाही महिलांनीच आपल्यावर टीका करावी, याचं ब्लेझला फार दु:ख वाटतं. 

ब्लेझ सर्वांत जास्त प्रसिद्धीला आली ती २०१८ मध्ये. ‘वर्ल्डस् हॉटेस्ट ट्रक ड्रायव्हर’चा बहुमान तिला मिळाला. त्यामुळे जगभरात तिचं नाव झालं. पण, सोशल मीडिया स्टार झाल्यानंतर तिच्या प्रसिद्धीला कमतरता राहिली नाही. खरंतर, आता ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करण्याचीही गरज तिला नाही, इतका पैसा तिला आपल्या फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून मिळतो. पण ब्लेझ म्हणते, ट्रक ड्रायव्हिंग हे माझं पॅशन आहे. मला या क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी, घालवण्यासाठी अनेक लोक टपून बसले आहेत. पण, मी त्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही. ट्रक ड्रायव्हिंगमुळेच मी माझ्या साऱ्या चिंता आणि माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकते. ट्रक ड्रायव्हिंग ही माझी प्रेरणा आहे. आयुष्याच्या अखेरपर्यंत ट्रकचं व्हील माझ्या हातात असावं अशी माझी इच्छा आहे. 

ट्रक ड्रायव्हिंग आणि ‘ओन्ली फॅन्स’च्या माध्यमातून ब्लेझ वर्षाकाठी सुमारे दोन-अडीच लाख डॉलर्स सहज कमावते. ड्रायव्हिंगच्या माध्यमातून साधारण ८५ हजार डॉलर्स तर फोटो, व्हिडिओंच्या माध्यमातून साधारण दीड लाख डॉलर्सची कमाई ती करते.

तरुणींनो, ट्रक ड्रायव्हर व्हा!ब्लेझ म्हणते, लहानपणापासूनच काहीतरी हटके करायचं माझं स्वप्न होतं. त्यात ट्रक ड्रायव्हिंगसारखं अनोखं क्षेत्र मला सापडलं. लहानपणी मी बार्बीसारखे कपडे घालून मिरवत असले, तरीही आपण एक ‘मुलगा’ आहोत, असंच मला वाटायचं. या क्षेत्रात यायचं तर तुम्ही रफटफ असलं पाहिजे. कोणत्याही छोट्या-मोठ्या कारणांनी डगमगून जाता कामा नये. याबाबत कोणी तुमच्यावर टीका केली आणि तुम्ही फुरंगटून बसलात, तर हे क्षेत्र तुमच्यासाठी नाही, पण काही हटके करायचं असेल, तर खरंच ट्रक ड्रायव्हिंग करून पाहा.. असं ती तरुणींना आवर्जून सांगते..