नवी दिल्ली-
अमेरिकेच्या लॉस अँजलिसहून ब्रिटनच्या बोस्टनला जाणाऱ्या एका विमानात खळबळ उडाली. एक प्रवासी विमान हवेत असताना चक्क विमानाचा आपत्कालीन दरवाजा (Emergency Door) उघडण्याचा प्रयत्न करू लागला. इतकंच नाही, तर त्यानं काही वेळानंतर विमानातील कर्मचाऱ्याच्या मानेवर टोकदार वस्तूनं हल्ला देखील केला. सहप्रवाशांनी त्याला कसंबसं रोखलं आणि पकडलं. विमान लँड झाल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
आरोपीचं ओळख पटली असून त्याचं नाव सेवेरो टोरेस (३३) असं आहे. टोरेस ब्रिटनचा रहिवासी आहे. तो लॉस अँजलिसहून बोस्टनला जाणाऱ्या युनाइटडेट एअरलाइन्सच्या विमानातून प्रवास करत होता. विमान लँड होण्याच्या ४५ मिनिटं आधी हा सगळा प्रकार घडला. टोरेस यांना फ्लाइटचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सिक्युरिटी अलार्म वाजण्यास सुरुवात जाली. अलार्म ऐकू येताच फ्लाइटचे क्रू मेंबर्स तिथं पोहोचले.
फ्लाइटच्या क्रू मेंबर्सना लक्षात आलं की आपत्कालीन दरवाजासोबत छेडछाड झाली आहे. जवळपास दरवाजा उघडलाच होता. या गोष्टीची माहिती तातडीनं फ्लाइटच्या कॅप्टनला देण्यात आली. टोरेस यानंच हे केलेलं असावं असा क्रू मेंबर्सना संशय होता. कारण तोच या दरवाजाजवळ उभा होता.
संशयाच्या आधारे टोरेस याची विचारपूस केली असता त्यानं नकार दिला. तसंच सीसीटीव्ही फुटेज तुम्ही हवंतर तपासू शकता असंही टोरेस म्हणाला. थोड्यावेळानं टोरेस दुसऱ्या एका आपत्कालीन दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला. जिथं आधीपासूनच दोन क्रू उपस्थित होते.
टोरेसनं केला क्रू मेंबरवर हल्लाअचानक टोरेस यानं एका क्रू मेंबरवर फोक चमच्यानं हल्ला केला. टोरेस यानं तीनवेळा क्रू मेंबरच्या मानेवर वार केले. सहप्रवाशांनी तातडीनं घटनेचं गांभीर्य ओळखत त्याला रोखलं आणि पकडलं. फ्लाइट लँड झाल्यानंतर टोरेस याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. ज्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं.
टोरेसवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून यात जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रयत्नाचाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात त्याला आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता ९ मार्च रोजी होणार आहे.