ब्राझीलच्या ॲमेझॉनमध्ये विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ॲमेझॉनच्या बार्सेलोस प्रांतात ही घटना घडली आहे. ब्राझीलच्या ॲमेझॉनमध्ये विमान कोसळले. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ॲमेझॉनच्या बार्सेलोस प्रांतात ही घटना घडली आहे.
ॲमेझॉनचे गव्हर्नर विल्सन लिमा म्हणाले की, खेदाने कळवावे लागते की शनिवारी बार्सेलोस येथे झालेल्या विमान अपघातात दोन क्रू सदस्यांसह १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. पीडितांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. आमची टीम अत्यावश्यक सहाय्य देण्यासाठी काम करत आहेत, असं विल्सम लिमा यांनी सांगितले.
सदर विमान मनुआस एरोटॅक्सी एअरलाइनचे होते. विमान कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, या कठीण काळात अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या गोपनीयतेवर आम्ही अवलंबून आहोत आणि तपास जसजसा पुढे जाईल तसतशी सर्व माहिती प्रदान केली जाईल.
खराब हवामानामुळे विमान कोसळले
सिव्हिल डिफेन्सच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, या घटनेत कोणीही वाचले नाही. वृत्तानुसार, विमान लँड करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. या विमानाने मनौस येथून उड्डाण केले. स्थानिक वेळेनुसार दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. वृत्तानुसार विमान खराब हवामानामुळे कोसळले असावे, लँडिंगच्यावेळी मुसळधार पाऊस पडत होता.