शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: हरयाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं 'टेन्शन'; चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी!
2
हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
3
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."
4
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
5
Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?
6
अयोध्या आणि बद्रीनाथमध्ये BJP चा पराभव; जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवीने दिला आशीर्वाद
7
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
8
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
9
निवडणुकीपूर्वीची भाजपाची 'अशी' रणनीती; ज्यानं हरियाणात बिघडला काँग्रेसचा खेळ
10
जुलाना दंगल! Vinesh Phogat नं मारलं मैदान; WWE रेसलिंगमधील 'राणी'चं डिपॉझिट जप्त
11
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
12
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
13
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
14
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
15
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
16
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
17
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
18
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
19
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
20
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?

World Population: जगाची लोकसंख्या आता ८०० कोटींवर, मानवी इतिहासातील महत्त्वाचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 7:01 AM

World Population: जगाची एकूण लोकसंख्या आता ८०० कोटींवर पोहोचली असून, हा मानवाच्या इतिहास व विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे

नवी दिल्ली : जगाची एकूण लोकसंख्या आता ८०० कोटींवर पोहोचली असून, हा मानवाच्या इतिहास व विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी म्हटले आहे. पृथ्वीतलावर असलेल्या माणसांच्या लोकसंख्येबरोबरच त्यांच्या जबाबदारीतही वाढ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जगातील लोकसंख्या मंगळवारी ८०० कोटींवर पोहोचणार असल्याचे संयुक्त राष्ट्रे व इतर काही संस्थांनी म्हटले होते. जागतिक स्तरावर वाढत्या लोकसंख्येबरोबरच अन्न, पाणी यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. हवामान बदलामुळे ऋतूचक्रात बदल होत असून, त्यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस यांचे प्रमाण वाढले आहे. 

प्रदूषणाची पातळी वाढल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. इतक्या सर्व समस्यांना  तोंड देण्यासाठी मानवाने अधिक  सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी जगातील प्रत्येक देशाने लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण प्रभावीपणे राबविले पाहिजे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी वेळोवेळी केले आहे.  (वृत्तसंस्था)

विकसनशील, गरीब देशांत अधिक लोकसंख्याजगात विकसित, विकसनशील व तिसऱ्या जगातील गरीब देश असे तीन तट आहेत. अमेरिकेसह पाश्चिमात्य देश विकसित गटात, तर भारत, चीनसारखे देश विकसनशील देशांच्या गटात मोडतात. आफ्रिका खंडातील अनेक गरीब देशांकडे अद्याप पुरेशा पायाभूत सुविधाही नाहीत.कोरोना काळात जाणवली अधिक विषमताकोरोना साथीच्या काळात जगातील विषमतेच्या दरीचे अधिक भेसूर दर्शन झाले. अमेरिका व पाश्चिमात्य देशांकडे पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होत्या. तर गरीब देशांकडे लसींचा मोठा तुटवडा होता. ही दरी अद्याप भरून निघालेली नाही. तिसऱ्या जगातील गरीब देशांमध्ये तसेच भारत, चीनसारख्या विकसनशील देशांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण मोठे आहे. पाश्चिमात्य देशांत लोकसंख्येवर उत्तम नियंत्रण राखण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची भौतिक प्रगतीही उत्तम झाली आहे.

२०८० सालानंतर लोकसंख्येत होणार नाही फारशी वाढ २०३० सालापर्यंत जगाची लोकसंख्या ८.५ अब्जांवर पोहोचणार आहे. २०५० मध्ये हाच आकडा ९.७ अब्ज, तर २०८० मध्ये १०.४ अब्जांवर पोहोचणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी याआधीच व्यक्त केला आहे. २०८० नंतर जगातील लोकसंख्येत वाढ होणार नाही. २०८०मध्ये जगाची जितकी लोकसंख्या असेल, तितकीच ती २१०० सालीही राहण्याची शक्यता आहे.

चीनला मागे टाकणार  २०२१ साली भारताची लोकसंख्या १.३९ अब्ज, तर चीनची लोकसंख्या १.४१ अब्ज होती. मात्र २०२३ साली लोकसंख्येबाबत भारत चीनला मागे टाकणार आहे. जगातील संभाव्य महाशक्ती अशी ओळख असलेला भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणूनही पुढील वर्षीपासून ओळखला जाण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत