वॉश्गिंटन – यूक्रेनवर रशियाच्या हल्ल्याची शक्यता लक्षात घेता अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना परत येण्याचं आवाहन केले आहे. यूक्रेनमधील अमेरिकी दूतावासाने सर्व अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला तात्काळ यूक्रेन सोडण्याचे आदेश दिले आहेत. दूतावासात कार्यरत असलेले कर्मचारी सरकारी खर्चात पुन्हा देशात परतू शकतात. यूक्रेनच्या सीमेवर रशियाच्या सैनिकांचं संख्याबळ वाढलं आहे. सध्याच्या स्थितीत कुठल्याही क्षणी हल्ला होण्याची दाट शक्यता आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन म्हणाले की, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेड लावरोव यांच्यासोबत तणावाची स्थिती कमी करण्यासाठी शुक्रवारी चर्चा झाली. परंतु त्यात यश आलं नाही. किव स्थित अमेरिकन दूतावास कार्यालय सुरु राहील. यूक्रेनमध्ये अमेरिकेचे अधिकारी उपस्थित राहतील. मागील अनेक दिवसांपासून दोन्ही देशांच्या संघर्षावर चर्चा सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली.
तर दुसरीकडे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी ब्रिटनचा दावा फेटाळून लावला. रशियाला यूक्रेन येथील सरकार रशियन समर्थित प्रशासनात बदलण्याची इच्छा आहे. यूक्रेनचे माजी खासदार येवेनी मुरायेव यासाठी संभाव्य उमेदवार आहेत. विशेष म्हणजे रशिया समर्थक नाशी पार्टीचे ते प्रमुख आहेत. ज्यांच्याकडे यूक्रेनमध्ये सध्या संसदेत एकही जागा नाही. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यूक्रेनच्या अन्य नेत्यांचीही नावं घेतली. ज्यांचे रशियाच्या गुप्तचर संस्थेशी संबंध आहेत.
मुरायेव न्यूज एजन्सी AP ने सांगितले की, ब्रिटनचा दावा हास्यास्पद आहे. रशियन सुरक्षेला धोका पाहता २०१८ नंतर रशियात त्यांना प्रवेश बंदी केली आहे. यूक्रेनचे सर्वात मोठे रशिया समर्थक नेते व्लादिमीर पुतीनचे मित्र विक्टर मेदवेदचुक संघर्ष सुरु आहे. नाशी पार्टी रशियाप्रती सहानुभूती ठेवते. परंतु मुरायेव यांनी फेसबुक पोस्टवर लिहिले की, पश्चिम समर्थक आणि रशिया समर्थक नेत्यांचा दौरे यूक्रेनमध्ये कायमचे समाप्त झालेत.
NATO मुळं टेन्शन वाढलं
यूक्रेन राजकीय विश्लेषकांच्या मते, मुरायेवला यूक्रेनमध्ये रशिया महत्त्वाचा नेता बनवू इच्छिते. परंतु मुरायेव क्रेमलिनसोबत थेट संपर्क आहे असं वाटत नाही. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनचा दावा फेटाळला आहे. ब्रिटनकडून पसरवण्यात येणारी बातमी पाहता नाटो( उत्तर अटलांटिक संघटन) यूक्रेनजवळ तणाव वाढण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रिटनने उकसवण्याचे काम बंद करावे असं रशियाने म्हटलं आहे.