लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पृथ्वीसारखीच जीवसृष्टी असण्याची शक्यता असलेल्या एका नव्या ग्रहाचा शोध खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे. रॉस ५०८ बी या नावाने ओळखला जाणारा हा ग्रह ‘सुपर अर्थ (पृथ्वी)’ या नावानेही प्रसिद्ध आहे. तो ग्रह आपल्या सौरमालेच्या व आकाशगंगेच्या जवळ आहे.
या नव्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्याचा अंश असण्याची शक्यता खगोलशास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. जेम्स वेब अंतरिक्ष दुर्बिणीच्या साह्याने रॉस ५०८ बी या ग्रहाचे बारकाईने निरीक्षण करण्यात येत आहे. सुबारू टेलिस्कोपच्या साह्याने खगोलशास्त्रज्ञांनी हा ग्रह सर्वप्रथम शोधून काढला. आपल्या आकाशगंगेतील ताऱ्यांपैकी तीन चतुर्थांश तारे हे लाल रंगाचे छोट्या आकाराचे तारे आहेत. असे तारे आपल्या सूर्यमालेच्या आसपास मोठ्या संख्येने अस्तित्वात आहेत. त्यांच्याबाबत संशोधन करत असताना रॉस ५०८ बी या ग्रहाचा शोध लागला.
ब्रह्मांडातील छोट्या आकाराचे लाल ताऱ्यांचे निरीक्षण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र, हे तारे दृश्यमान प्रकाशातही खूप धूसर दिसतात. (वृत्तसंस्था)
सुस्पष्ट छायाचित्रे गवसली नाहीतखगोलशास्त्रज्ञांनी सांगितले की, रॉस ५०८ बी या ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असण्याची शक्यता आहे. सध्या अवकाश संशोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या दुर्बिणींचा रोख या ग्रहाच्या मध्यवर्ती ताऱ्याजवळील परिस्थितीचे निरीक्षण करण्याकडे आहे. त्यामुळे रॉस ५०८ बी या ग्रहाची अतिशय सुस्पष्ट छायाचित्रे टिपणे शक्य होत नाही.
सुपर अर्थ पृथ्वीपासून ३७ प्रकाशवर्षे दूर अंतरावररॉस ५०८ बी हा ग्रह पृथ्वीपासून ३७ प्रकाशवर्षे दूर आहे. त्याचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या एक पंचमांश आहे. या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा चार पट आहे. हा ग्रह व त्याचा मध्यवर्ती तारा यांच्यातील अंतर पृथ्वी व सूर्यातील अंतरापेश्रा ०.०५ पट अधिक आहे.
४००० अंशांपेक्षा या ताऱ्यांच्या पृष्ठभागावरील तापमान कमी असते. अशा लाल ताऱ्यांपैकी शोधण्यात आलेला, नीट निरीक्षण सुरू असलेला प्रॉक्सिमा सेंटॉरी बी हा एकमेव तारा आहे.