मध्य आशियातील कझाकिस्तानमध्ये एक अतिशय मोल्यवान गोष्ट आढळी आहे. जी या देशाला मालामाल बनवून, त्याचे भविष्य बदलू शकते. खरे तर, कझाकिसतानात आतापर्यंतचा सर्वात मोठा दुर्मिळ पृथ्वी धातूंचा साठा सापडला आहे. यात जवळपास एक मिलियन टन एवढे तत्व आहे, असे मानले जाते. हा धातू भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो.
माध्यमांतील वृत्तांनुसार, हा दुर्मिळ धातू हरित ऊर्जेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. चीन, रशिया, अमेरिका आणि युरोपमध्ये त्यांची मोठी मागणी आहे. कझाकिस्तानच्या उद्योग मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "कझाकिस्तानमध्ये सापडलेला हा सर्वात मोठा साठा आहे." कुठे सापडला 'खजिना'?हा खजिना कझाकिस्तानातील करागांडा भागात आढळला आहे. यात सेरियम, लॅन्थॅनम, निओडीमियम आणि यट्रियमचा समावेश आहे. या शोधाची घोषणा युरोपीय युनियन-मध्य आशिया शिखर परिषदेपूर्वी करण्यात आली आहे. ही परिषद उझबेकिस्तानमध्ये सुरू होत आहे. या भागात EU (युरोपीय युनियन), रशिया, चीन आणि तुर्की आपला प्रभाव मजबूत करू इच्छित आहेत. या शिखर परिषदेत मध्य आशियातील कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उजबेकिस्तान या पाच देशांतील नेते सहभागी होणार आहेत. याच बरोबर, याच बोरबर युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन आणि यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष एंटोनियो कोस्टा देखील सहभागी होतील.
कझाकस्तानच्या उद्योग मंत्रालयाने अंदाजा लावला आहे की, या नव्या ठिकानी संसाधनांचे संभाव्य प्रमाण २० मिलियन टनहूनही अधिक असू शकते. अधिक संशोधन केले गेले तर कझाकस्तानची स्थितीच बदलून जाईल. यामुळे भविष्यात कझाकिस्तानला दुर्मिळ धातूंचे सर्वाधिक साठे असलेल्या देशांमध्ये स्थान मिळू शकते."