वॉशिंग्टन : महासत्ता अमेरिका प्रथमच डिफॉल्टर होण्याच्या उंबरठ्यावर आहे. कर्ज मर्यादा न वाढविल्यास त्याचे केवळ अमेरिकाच नव्हे तर जगभरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. डिफॉल्ट झाल्यास अमेरिकेत मंदी येणार हे निश्चित असून सुमारे ८३ लाख नोकऱ्यांवर संकट येऊ शकते.
अमेरिकेत सध्या व्याजदर २००६ नंतरच्या उच्चांकी पातळीवर आहे. देश कर्जाची परतफेड करण्यास अपयशी ठरल्यास सर्व बॉड, व्यावसायिक बॅंकांनी परकीय चलनाशी संबंधित कर्जाचे करार इत्यादींवर विपरीत परिणाम होतील.
२१ वर्षीय युवकाला का घाबरली बलाढ्य अमेरिका?; म्हणते, राष्ट्रीय सुरक्षेला धोका
बॉड बाजारातून अमेरिकेला पैसा उचलण्यापासून रोखले जाऊ शकते. त्यामुळे आणखी कर्ज घेण्यासाठी डेट सीलिंग अर्थात मर्यादा वाढविण्यासाठी बायडेन प्रशासनाने तयारी केली आहे.
पर्याय काय?
कर्ज मर्यादा वाढविण्यासाठी बायडेन प्रशासनाला रिपब्लिकन पक्षासाेबत चर्चा करावी लागेल.जो बायडेन राज्यघटनेतील १४व्या दुरुस्तीचा वापर करून संसदेत रिपब्लिकन खासदारांच्या संख्या मर्यादित ठेवू शकतात. तसेच करून ते सीनेट व प्रतिनिधी सभेच्या बहुमताशिवाय कर्ज मर्यादा वाढवू शकतात.
फेडरल रिझर्व्हकडे न जाता हवी तेवढी प्लॅटिनम नाणी छापून संकटातून बाहेर पडणे शक्य आहे. मात्र, तसे केल्यास महागाई गगनाला भिडेल.