शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

“भारताच्या विकासाचा वेग संपूर्ण जगाला दिसेल,” अमेरिकन अब्जाधीशानं केलं अर्थव्यवस्थेचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:52 PM

भारताचा विकास दर जगातील सर्वात वेगवान असेल, असे ते म्हणाले.

अमेरिकन अब्जाधीश रे डॅलिओ यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन अब्जाधीश रे डॅलिओ यांनी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2023 दरम्यान सांगितले की, भारताचा विकास दर जगातील सर्वात वेगवान असेल. “उर्वरित जगाच्या तुलनेत भारतात सर्वात मोठा बदल पाहायला मिळेल,” असे रे डालिओ म्हणाले. 'सरकार आणि बदलती जागतिक व्यवस्था' या विषयावरील सत्रादरम्यान, डॅलिओ यांनी या विषयावर भाष्य केले. भारताची आगामी वर्षांमध्ये सर्वात मोठी वाढ होईल. भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे ते म्हणाले. गेल्या 10 वर्षांच्या अभ्यासानुसार आणि आपण देशासाठी जे पाहत आहोत त्या आधारावर भारताचा विकास दर सर्वात मोठा आणि वेगवान असेल. या देशात उर्वरित जगाच्या तुलनेत सर्वात मोठा बदल दिसेल, असेही त्यांनी नमूद केले.

“”सत्ता संघर्षात गुंतलेल्या अमेरिका आणि चीन हे मागे राहतील. येत्या काही वर्षांत भारत विकासाच्या दृष्टीने वेगाने प्रगती करू शकेल,” असे ब्रिजवॉटर असोसिएट्सचे संस्थापक रे डॅलिओ म्हणाले. युएईचे कॅबिनेट व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल्ला अल गेर्गावी यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान डॅलियो म्हणाले की, “जे देश युद्धापासून दूर राहतात त्यांना फायदा होईल. भारताचा विकास दर चांगला आहे. आगामी काळात पुढे जाण्याची भारताकडे पूर्ण क्षमता आहे.”

कोण आहेत डॅलिओ?रे डॅलिओ ब्रिजवॉटर असोसिएट्सचे को-चेअरमन आणि चीफ इन्व्हेस्टमेंट अधिकारी आहेत. ब्रिजवॉटर असोसिएट्स फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह  कार्यक्रमाचा एक भाग होता. त्याला 'डेव्होस इन द डेझर्ट' असेही म्हणतात. विविध देशांतील हायप्रोफाईल लोक यात भाग घेतात. रे डॅलिओ यांनी यापूर्वीही अनेक प्रसंगी भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. त्यांच्या मते भारतीय अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था