शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
LIC नं Tata Group मधील 'या' कंपनीतील हिस्सा विकला, शेअर जोरदार आपटला
5
Maharashtra Election 2024 Live Updates: राज ठाकरे यांची आज वरळीत दुसरी जाहीर सभा, कोणावर साधणार निशाणा?
6
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
7
सलमान खानला पाठवले धमकीचे मेसेज! पोलिसांनी युवा गीतकाराला ठोकल्या बेड्या; समोर आलं मोठं कारण
8
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
9
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
10
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
11
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
12
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
13
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
14
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
15
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
16
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
17
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
18
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
19
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!

घरात पती-पत्नीने किती काम करायचे सरकार सांगणार! स्पेन सरकार २ कोटी खर्च करून तयार करणार ॲप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 8:17 AM

घरातील प्रत्येक सदस्य घरातील कामासाठी किती वेळ देत आहे हे देखील ॲप ट्रेस करेल.

माद्रिद : पती घरातील कामे करत आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी स्पेन सरकार एक ॲप  आणणार आहे. हे ॲप बायकांना सांगेल की त्यांचे पती घरातील कामात किती वेळ घालवतात. हे ॲप आणण्यामागे घरातील कामे स्त्री-पुरुषांमध्ये विभागणे हा आहे.

घरातील प्रत्येक सदस्य घरातील कामासाठी किती वेळ देत आहे हे देखील ॲप ट्रेस करेल. यासाठी सरकार दोन कोटी रुपये खर्च करत आहे. ॲप लाँच केल्यानंतर, पुरुष आणि महिलांच्या घरगुती कामावर देखरेख करणारा स्पेन हा पहिला देश असेल.

महिलांवर ताण लक्षात येणारnस्पेन सरकारच्या ॲपमुळे घरामध्ये महिलांवर पडणाऱ्या असंख्य कामाचा मानसिक भार समोर येईल. महिलांचे सक्षमीकरण आणि लैंगिक समानता दूर करण्यासाठी देशात सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यावर्षी मार्चमध्ये स्पेनने लैंगिक समानता कायदा आणला आहे. nया अंतर्गत कॉर्पोरेट बोर्डात किमान ४० टक्के महिला असणे आवश्यक आहे. यासोबतच मंत्रिमंडळात महिलांचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात महिलांचा कोटा ४४ टक्के आणि वरच्या सभागृहात ३९ टक्के ठेवण्यात आला आहे.

सर्वेक्षण काय सांगते? : नॅशनल स्टॅटिस्टिक्स इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास निम्म्या महिलांनी सांगितले की, त्या त्यांच्या घरातील बहुतांश कामे करतात. त्याच वेळी, १५% पेक्षा कमी पुरुषांनी सांगितले की ते घरातील अनेक कामे करतात.

घरातील कामांचे वाटप होणारस्पेनच्या लैंगिक समानता मंत्री अँजेला रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, हे ॲप पती-पत्नी यांच्यात घरातील काम शेअर करण्यासाठी मदत करेल. या लोकांमध्ये कामाच्या वाटपात मोठी असमानता आहे.

ॲपची गरज का पडली? nस्पेनमध्ये अनेक वर्षांपासून घरगुती कामातील स्त्री-पुरुष असमानतेने कायदेशीर वादाचा रंग घेतला आहे. एप्रिल २०१७ मध्ये कँटाब्रिया येथील न्यायालयाने एका पुरुषाला त्याच्या पत्नीला २०.६२ लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. nया वर्षाच्या सुरुवातीला, वेलेझ-मलागा येथील न्यायालयाने एका व्यावसायिकाला त्याच्या पत्नीला २५ वर्षांच्या बिनपगारी घरगुती कामासाठी १.८३ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते.