सूर्य हा सूर्यमालेतील सर्वात शक्तिशाली आणि एकमेव तारा आहे हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण या सूर्याला तडा गेलाय आणि त्याचा थोडा भाग मूळ सूर्यातून निखळून पडलाय असं जर तुम्हाला कोणी सांगितले तर.... पण हे खरंच घडल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की सूर्याचा एक मोठा भाग तुटला आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने सूर्यास्ताची ही घटना पाहिली आहे. यामुळे शास्त्रज्ञ आश्चर्यचकितही झाले आहेत पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेमुळे शास्त्रज्ञ चिंताग्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे. सूर्याचा हा तुटलेला भाग अजूनही त्याच्या कक्षेतच असल्याने त्याच्याभोवती फिरत आहे. पण अहवालानुसार, तुटलेला तुकडा सूर्याच्या उत्तर ध्रुवावर चक्रीवादळाप्रमाणे फिरत आहे.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचा शोध
NASA च्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोपने या आठवड्याच्या सुरुवातीला अभूतपूर्व शोध लावला. अवकाश हवामानाचा अंदाज वर्तविणारे तमिथा शोव यांनी या विलक्षण दृश्याचे फुटेज शेअर केले आहे. याच संदर्भातील ध्रुवीय भोवऱ्याबद्दल जर बोलायचे असेल तर काही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहे. "मुख्य तंतूपासून विलग झालेला उत्तरेकडील भाग आता आपल्या ताऱ्याच्या उत्तर ध्रुवाभोवती एका विशाल ध्रुवीय भोवऱ्यात फिरत आहे. येथे, ५५ अंशात अक्षांशापेक्षा जास्त, सूर्याची वातावरणीय गतिशीलता समजून घेणे आवश्यक आहे." असे अतिशय मुद्देसूद विश्लेषण त्यांनी केले आहे.
सूर्याला तडे गेल्यास पृथ्वीवर काय प्रभाव
Spaceweather.com नुसार, मंगळवार (७ फेब्रुवारी) प्रशांत महासागरात मध्यम आकाराच्या, शक्तिशाली सौर ज्वालामुळे शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउट झाला. भौतिकशास्त्रज्ञ स्कॉट मॅकिन्टोश यांनी स्पष्ट केले की बोल्डर, कोलोरॅडोमध्ये नॅशनल सेंटर एटमॉस्फेरिक रिसर्च चे उपनिदेशक आणि सौरभौतिक विषयातील जाणकार शास्त्रज्ञ स्कॉट मैकिन्टोश यांनी या बाबत काही गोष्टी समजवून सांगितल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक सौर चक्रात एकदा काहीतरी विचित्र होणे किंवा सूर्य ५५ अंश अक्षांशात जाणे ही घटना किंवा प्रक्रिया विचित्र किंवा असामान्य नाही. सूर्याच्या ५५ अंश अक्षांशावर अशा गोष्टी घडू शकतात. पण यासोबतच त्यांनी निरीक्षणातील आणखी एक बाब नोंदवली, ती म्हणजे सूर्याच्या आसपास जो भोवरा दिसू लागला आहे. तसा भोवऱ्यासारखा प्रकार किंवा आकृती त्यांनी आधी कधीही पाहिलेले नाही. त्यामुळे ही बाब चिंताजनक ठरू शकते.